रुग्णालयातील धक्कादायक वास्तव! नवजात बाळ ट्रेमध्ये, ऑक्सिजन सिलेंडर खांद्यावर अन् 'ते' शोधत होते डॉक्टर पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 09:17 AM2020-07-27T09:17:28+5:302020-07-27T09:29:27+5:30

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच रुग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

bihar oxygen cylinder on shoulder and newborn in tray couple wandering hospital | रुग्णालयातील धक्कादायक वास्तव! नवजात बाळ ट्रेमध्ये, ऑक्सिजन सिलेंडर खांद्यावर अन् 'ते' शोधत होते डॉक्टर पण...

रुग्णालयातील धक्कादायक वास्तव! नवजात बाळ ट्रेमध्ये, ऑक्सिजन सिलेंडर खांद्यावर अन् 'ते' शोधत होते डॉक्टर पण...

googlenewsNext

पाटणा - देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे.  देशांमधील मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांना लवकर शोधून काढणे व संसर्ग झालेल्यांचे प्राण वाचविणे या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे. देशातील विविध ठिकाणी कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. मात्र याच दरम्यान काही घटना समोर येत आहेत अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच रुग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. आपल्या नवजात बाळाचा जीव वाचवण्यासाठी एक दाम्पत्य वणवण फिरत होते. ऑक्सिजन सिलेंडर खांद्यावर आणि बाळाला ट्रेमध्ये घेऊन ते डॉक्टरांना शोधत असल्याची घटना समोर आली आहे. मात्र नवजात बाळाला वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बिहारमध्ये मन सुन्न करणारी ही घटना घडली आहे. 

बाळाच्या उपचारासाठी ऑक्सिजन सिलेंडर खांद्यावर घेऊन फिरत असलेल्या या दाम्पत्याचा एक फोटोही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या एका रुग्णालयातील हे दृश्य आहे. राजपूरमधील सखुआना गावात राहणारे सुमन कुमार यांनी आपल्या पत्नीला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र पत्नीची प्रकृती गंभीर असल्याने रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी प्रसूती करण्यास नकार दिला. त्यानंतर ते आपल्या पत्नीसमवेत दुसऱ्या रुग्णालयात गेले. तिथे त्यांची प्रसूती करण्यात आली. 

प्रसूतीनंतर नवजात बाळाला त्रास होऊ लागला. त्यांची प्रकृती गंभीर झाली त्यामुळे उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तेथील कर्मचाऱ्यांनी नवजात बाळाला ट्रेमध्ये ठेवत, वडिलांच्या खांद्यावर ऑक्सिजनचे सिलेंडर दिलं आणि या दाम्पत्याला पाठवलं. बाळाचा जीव वाचावा म्हणून हे दाम्पत्य डॉक्टरांना शोधत फिरत होतं. मात्र वेळेत उपचार न मिळाल्याने बाळाचा अखेर मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : शुभमंगल साssवधान! लग्न पडलं महागात, 80 जण कोरोना पॉझिटिव्ह, अनेकांचा जीव धोक्यात

बापरे! भरधाव ट्रेनसमोर जीवघेणा खेळ अन्...; अंगावर काटा आणणारा Video जोरदार व्हायरल 

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! 'या' देशात घराघरात, रस्त्यावर आढळताहेत मृतदेह, परिस्थिती गंभीर

"हल्ली विरोधी पक्षनेतेपदाचे दिवस धूमधडक्यात साजरे होताहेत", मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना चिमटा

शाळा ही कन्सेप्ट बाजूला ठेवून शिक्षणाचा विचार करावा लागेल, उद्धव ठाकरेंचं महत्त्वपूर्ण विधान

डॉक्टर व्हावंसं वाटायचं, नाही झालो ते बरंच झालं; उद्धव ठाकरेंचं 'होमिओपॅथी कनेक्शन'

कोरोनासोबत जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं?...खुद्द मुख्यमंत्र्यांनीच समजावलं

Web Title: bihar oxygen cylinder on shoulder and newborn in tray couple wandering hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.