बिहारमध्ये ४५ लाचखोर पोलीस सस्पेंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 04:08 AM2019-11-13T04:08:40+5:302019-11-13T04:08:43+5:30
बिहारची राजधानी असलेल्या पाटणा शहरातील ४५ तब्बल ४५ पोलीस कर्मचाऱ्यांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे.
पाटणा : बिहारची राजधानी असलेल्या पाटणा शहरातील ४५ तब्बल ४५ पोलीस कर्मचाऱ्यांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे. छठ पूजेच्या काळात गंगा नदीवरील महात्मा गांधी पुलावरून अवजड वाहनांच्या चालकांकडून लाच घेऊ न त्यांना जाऊ दिल्याने ही कारवाई करण्यात आली.
निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये सहा पोलीस निरीक्षक, सात विशेष पोलीस निरीक्षक आणि ३२ पोलीस शिपायांचा समावेश आहे.
बिहारमध्ये छठपूजा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्यावेळी हजारो लोक गंगा नदीवर जात असतात. त्यावेळी ते महात्मा गांधी पुलाचा वापर येण्या-जाण्यासाठी करतात. त्यामुळे या काळात अपघात टाळण्यासाठी महात्मा गांधी पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी या वाहनांना जाण्याची परवानगी
दिली. त्या बदल्यात ते वाहनचालकांकडून लाच घेत होते, असे आढळून आले. त्यामुळे या पुलावर वाहुतकीची प्रचंड कोंडी झाली आणि भाविकांना खूप त्रास झाला.
लाचेतून जी रक्कम जमा झाली, तिच्या आपापसात वाटप करण्यावरून नंतर पोलिसांमध्ये मारामारी झाली. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. पोलीस अधीक्षकांनी ही चौकशी केली. पोलीस वाहनचालकांकडून लाच घेत असल्याचे आणि नंतर त्यांच्यात मारामारी झाली.
>बडतर्फीची कुºहाड?
या लाच प्रकरणानंतर महात्मा गांधी पुलावर नव्या पोलिसांना पाठविण्यात आले आहे. या पुलावरून जाण्यासाठी पोलीस नेहमीच अवजड वाहनचालकांकडून पैसे घेतात, असा आरोप आहे. यातून दरमहा लाखो रुपये जमा होतात, अशी चर्चा आहे.निलंबित करण्यात आलेल्या सर्व पोलिसांची विभागीय चौकशी केली जाणार असून, त्यानंतर कदाचित त्यांना बडतर्फ केले जाण्याची शक्यता आहे.