Bihar: बिहारमध्ये बदलताहेत राजकीय समिकरणे, RJD-JDU मध्ये फूट? तेजस्वी यादव म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 12:21 AM2023-01-17T00:21:31+5:302023-01-17T00:22:01+5:30

RJD Vs JDU: गेल्या काही वर्षांपासून बिहारच्या राजकारणात सुरू असलेली राजकीय अस्थिरता थांबण्याचे नाव घेत नाही आहे. भाजपासोबत असलेली आघाडी मोडून जेडीयूने आरजेडीसोबत पुन्हा महाआघाडी केल्यापासून राज्यात काही ना काही घडामोडी घडत आहेत.

Bihar: Political equations are changing in Bihar, split between RJD-JDU? Tejashwi Yadav said... | Bihar: बिहारमध्ये बदलताहेत राजकीय समिकरणे, RJD-JDU मध्ये फूट? तेजस्वी यादव म्हणाले...

Bihar: बिहारमध्ये बदलताहेत राजकीय समिकरणे, RJD-JDU मध्ये फूट? तेजस्वी यादव म्हणाले...

googlenewsNext

 पाटणा - गेल्या काही वर्षांपासून बिहारच्याराजकारणात सुरू असलेली राजकीय अस्थिरता थांबण्याचे नाव घेत नाही आहे. भाजपासोबत असलेली आघाडी मोडून जेडीयूने आरजेडीसोबत पुन्हा महाआघाडी केल्यापासून राज्यात काही ना काही घडामोडी घडत आहेत. आता राज्यातील महाआघाडीमध्ये फूट पडल्याच्या चर्चांना वेग आला आहे. आरजेडी आणि जेडीयूमधील नेत्यामध्ये सुरू असलेले वाकयुद्ध दोन्ही पक्षांमधील परस्पर सहमतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. या घडामोडींबाबत आरजेडीचे नेते आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना विचारले असता ते संतप्त झाले.
महाआघाडीमधील या बेबनावाबाबत विचारले असता तेजस्वी यादव यांनी प्रसारमाध्यमांनाच चार शब्द सुनावले. ते म्हणाले की, तुमच्या संस्थांमध्ये काय करायचं हे संपादक ठरवतात, की वार्ताहर संपादकांना सांगतात की, काय करायचं आहे ते, असे तेजस्वी यादव म्हणाले. 

बिहारच्याराजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिलेल्या आरजेडी आणि जेडीयूने २०२२ च्या ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा आघाडी करत सरकार स्थापन केले होते.  मात्र गेल्या काही दिवसांत नेत्यांमध्ये होत असलेल्या वाकयुद्धामुळे दोन्ही पक्षांतील मतभेद तीव्र होत असल्याचे दिसत आहे. दोन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये होत असलेल्या मतभेदांचे कारण आरजेडी नेते आणि शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी रामचरितमानस बाबत केलेले वादग्रस्त विधान असल्याचे सांगण्यात येत आहे.

या विधानावरून भाजपा राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका जेडीयू नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यावर कारवाई करण्याची मागणी जेडीयूकडून केली जात आहे. मात्र आरजेडी या मागणीवर अंमलबजावणी न करता परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे.  

Web Title: Bihar: Political equations are changing in Bihar, split between RJD-JDU? Tejashwi Yadav said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.