Lalu Prasad Yadav Snake Tweet: "साप तुमच्या घरात घुसलाय"; लालूंच्या जुन्या ट्वीटवरून भाजपाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 07:27 PM2022-08-10T19:27:52+5:302022-08-10T19:28:19+5:30
भाजपाच्या गिरीराज सिंह यांनी लालूंना केलं ट्रोल
Lalu Prasad Yadav Snake Tweet: बिहारमधील सत्ताबदलानंतर आता काही जुनी विधाने आणि ट्वीट्स चर्चेत येऊ लागली आहेत. भाजपाचे नेतेमंडळी नितीशकुमार आणि बिहारच्या नव्या सरकारवर सतत हल्लाबोल करत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या गिरीराज सिंह यांनी लालू प्रसाद यादव यांना त्यांच्या पाच वर्षे जुन्या ट्विटची आठवण करून दिली. या ट्विटमध्ये लालूप्रसाद यादव यांनी महाआघाडी सोडल्याबद्दल नितीश कुमार यांना साप म्हटले होते. गिरीराज सिंह यांनी लालू प्रसाद यादव यांच्या या ट्विटला रिट्विट करताना 'तुमच्या घरात साप घुसला' असे लिहित टोला लगावला.
सांप आपके घर घुस गया है। https://t.co/Cfsjj42cOw
— Shandilya Giriraj Singh (@girirajsinghbjp) August 10, 2022
नितीश कुमार यांच्या महाआघाडीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी भाजप नेते गिरिराज सिंह यांनी लालू प्रसाद यादव यांचे जुने ट्विट रिट्विट केले. गिरीराज सिंह यांनी ट्विट केले, तुमच्या घरात साप घुसला आहे. हे ट्विट २०१७ चे आहे. त्यावेळी नितीश कुमार महाआघाडीपासून वेगळे झाले होते. त्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी ट्विट केले होते की, "नितीश हा साप आहे, जसा साप आपली कात टाकतो, त्याचप्रमाणे नितीशही सारखी कात टाकतो आणि दर २ वर्षांनी सापासारखे नवीन कात धारण करतो. कोणाला (त्याच्या या स्वभावावर) शंका आहे का?"
जी सर, बिहार ने यही किया है। केंद्र और राज्य में भाजपाई मंत्रियों ने गंद फैला रखा था/है। महका दिया था। संघी गुंडे नंगे होकर लाठी और तलवार लहराने लगे थे।
— Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) August 9, 2022
देश के उज्जवल भविष्य के लिए लोकतंत्र की जननी बिहार विशेष रूप से विशेष निर्णय लेता है। यही आज देश और समय की माँग है। #कालचक्रhttps://t.co/E9nInlnF99
भाजपाच्या गिरीराज सिंग यांनीच नाही तर आरजेडीनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून २०१७च्या ट्विटला रिट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. २०१७ मध्ये नितीश NDAमध्ये सामील झाल्यानंतर, पीएम मोदींनी ट्विट केले होते की, 'देश आणि बिहारच्या भविष्यासाठी राजकीय मतभेदांच्या वरती जाणे ही काळाची गरज आहे. बुधवारी त्या ट्विटला RJD च्या अधिकृत हँडलने उत्तर दिले. 'होय सर, बिहार हेच करत आहे. केंद्रात आणि राज्यातील भाजपच्या मंत्र्यांनी घाण पसरवली होती. त्याची दुर्गंधी पसरली होती. लोकशाहीची जननी असलेल्या बिहारमध्ये देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी विशेष निर्णय घेतले जातात. ही आज देशाची आणि काळाची मागणी आहे. कालचक्र', असे राजदच्या ट्वीटर हँडलवरून करण्यात आले.