संतापजनक, क्वॉरंटाईन केलेल्या महिलांना साड्यांऐवजी देण्यात आली लुंगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 02:06 PM2020-05-22T14:06:56+5:302020-05-22T14:07:19+5:30
गेल्या काही दिवसात मोठ्या संख्येने कामगार दिल्ली, गाझियाबाद, मेरठ, बेंगळुरू आणि मुंबई येथून आपल्या गावी परतले आहेत.
विविध शहरांतून जे कामगार आपल्या गावी परतले आहेत. त्यांना गावक-यांनी प्रवेश देण्यास बंदी केली आहे. त्यांना थेट क्वॉरंटाईन सेंटरमध्ये पाठवले जात असून तिथे त्यांना १४ दिवस ठेवले जाते क्वॉरंटाईन केलेल्या लोकांची योग्य तपासणी केली जाते. रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना गावात प्रवेश दिला जात आहे. गेल्या काही दिवसात मोठ्या संख्येने कामगार दिल्ली, गाझियाबाद, मेरठ, बेंगळुरू आणि मुंबई येथून आपल्या गावी परतले आहेत. यातील काही लोकांना कोरोनाची बाधा झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
बिहारमध्ये काही महिलांना देखील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलांना योग्य वागणूक दिली जात नसल्याचे समोर आले आहे. महिलांनी परिधान करण्यासाठी साड्या मागितल्या तर त्यांच्या हातात चक्क लुंगी देण्यात आली. क्वॉरंटाईन केलेल्या लोकांसाठी या सेंटरमध्ये जेवण आणि नाश्त्याची देखील योग्य सोय केलेली नाही. तसेच परिसरात घाणीचेदेखील साम्राज्य पसरले आहे . तुर्तास हा प्रकार समोर येताच अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
या प्रकरणात मानवाधिकार संरक्षण फाऊंडेशन पुढे आली आहे. संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रदीपकुमार चौधरी यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार आणि दरभंगाचे डीएम यांच्याकडे तक्रार केली आहे.