Video: धावत्या ट्रेनमध्ये दारात बसलेल्या प्रवाशांना बेल्टने मारहाण; व्हिडीओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 02:16 PM2023-07-09T14:16:13+5:302023-07-09T14:17:53+5:30

व्हिडिओ समोर आल्यानंतर रेल्वे विभागाने दिले कारवाचे आश्वासन.

Bihar railway news, Passengers sitting at doors in running trains beaten with belts; Video viral | Video: धावत्या ट्रेनमध्ये दारात बसलेल्या प्रवाशांना बेल्टने मारहाण; व्हिडीओ व्हायरल...

Video: धावत्या ट्रेनमध्ये दारात बसलेल्या प्रवाशांना बेल्टने मारहाण; व्हिडीओ व्हायरल...

googlenewsNext

Indian Railway: भारतीय रेल्वेशी संबंधित अनेक व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता परत एकदा रेल्वेतील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका तरुणाने धावत्या ट्रेनमधून दुसऱ्या ट्रेनमधील लोकांना पट्ट्याने मारल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने कारवाईचे आश्वासन दिले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण धावत्या ट्रेनच्या दारात उभा असल्याचे दिसत आहे. तो हातात बेल्ट घेऊन बाजुने जाणाऱ्या ट्रेनच्या दारात बसलेल्या लोकांना पट्ट्याने मारताना दिसत आहे. हा तरुण फक्त मौजमजेसाठी हे धक्कादायक कृत्य करत असल्याचे दिसत आहे. अचानक बेल्टचा फटका बसल्यामुळे घाबरलेला कोणतीही व्यक्ती ट्रेनमधून पडू शकतो. 

रेल्वेने कारवाईचे आश्वासन दिले
मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ बिहारचा असल्याची माहिती आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना एका व्यक्तीने लिहिले- 'ही व्यक्ती दुसऱ्या ट्रेनमध्ये दारात बसलेल्या लोकांना बेल्टने मारत आहे. हे खरे आहे का? या व्यक्तीने बेल्टने मारल्यामुळे दरवाजात बसलेली व्यक्ती ट्रेनमधून पडू शकते, मोठा अपघातही होऊ शकतो. कृपया अशा समाजकंटकांवर कडक कारवाई करा.' त्याने या ट्विटमध्ये इंडियन रेल्वेला टॅग केले.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केपासून 460,000 हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर 4 हजारांहून अधिक लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. ट्विटर युजर्सनी आरोपी तरुणावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.  व्हिडीओ पाहून रेल्वेने याप्रकरणी कारवाईचे आश्वासन दिले आहे. 

Web Title: Bihar railway news, Passengers sitting at doors in running trains beaten with belts; Video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.