आरक्षणाची मर्यादा 50 वरुन 75% करणार, बिहारचे सीएम नितीश कुमार यांनी मांडला प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 04:59 PM2023-11-07T16:59:40+5:302023-11-07T17:00:13+5:30
बिहारमध्ये जातीय जनगणनेचा सविस्तर अहवाल मंगळवारी विधानसभेत सादर केला.
Bihar Reservation News: बिहार सरकारने राज्यातील जातीय जनगणनेचा सविस्तर अहवाल मंगळवारी विधानसभेत सादर केला. यावर चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी घोषणा केली आहे. नितीश कुमारांनी राज्यातील आरक्षणाची व्याप्ती 50 टक्क्यांवरून 75 टक्के करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
#WATCH | Patna: In the Bihar Assembly, Bihar CM Nitish Kumar says, "The 50% (reservation) should be increased to at least 65%... The upper caste has 10% already (EWS). So 65 and 10 make 75%. The remaining would be 25%. Earlier, 40% was free now it would be 25%. The reservation… pic.twitter.com/2UsOinNnOi
— ANI (@ANI) November 7, 2023
सीएम नितीश कुमारांनी बिहारमध्येआरक्षण 50 वरुन 65 टक्के करण्याचा प्रस्ताव मांडला. EWS च्या 10 टक्के आरक्षणासह हा आकडा 75 टक्के होईल. याआधी विधानसभेत जातीवर आधारित जनगणनेवर बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, हे काम पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले आहे. काही जातींची संख्या वाढली किंवा कमी झाली, यावर उपस्थित केला जाणारा प्रश्न अतिशय बोगस आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
आरक्षणाची व्याप्ती कशी वाढणार?
- सध्या SC साठी 16 टक्के आरक्षण वाढवून 20 टक्के केले जाणार आहे.
- एसटी 1 टक्क्यांवरून 2 टक्क्यांपर्यंत वाढणार
- ईबीसी (अत्यंत मागास) आणि ओबीसी यांना मिळून 43 टक्के आरक्षण दिले जाईल.
VIDEO | "When caste-based census has never happened before, how can you claim that this caste got more, and that one got less? This is a bogus claim," says Bihar CM @NitishKumar. pic.twitter.com/ynIP5xS3vv
— Press Trust of India (@PTI_News) November 7, 2023
महिला साक्षरतेबाबत विचित्र विधान
चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश म्हणाले की, बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. मुली शिक्षित झाल्या तर लोकसंख्याही नियंत्रणात येईल. या वक्तव्यादरम्यान महिला आमदार संतप्त झाल्या, तर इतर काही आमदार हसत होते.