बिहारच्या गायिका शारदा सिन्‍हा यांचे निधन; कॅन्सरमुळे एम्समध्ये होत्या दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 11:19 PM2024-11-05T23:19:40+5:302024-11-05T23:19:48+5:30

सिन्हा या २०१७ पासून कॅन्सरशी झुंझत होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतू अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.

Bihar singer Sharda Sinha passes away; She was admitted to AIIMS due to cancer   | बिहारच्या गायिका शारदा सिन्‍हा यांचे निधन; कॅन्सरमुळे एम्समध्ये होत्या दाखल  

बिहारच्या गायिका शारदा सिन्‍हा यांचे निधन; कॅन्सरमुळे एम्समध्ये होत्या दाखल  

बिहारच्या लोकगायिका पद्मभूषण शारदा सिन्हा यांचे कॅन्सरमुळे निधन झाले आहे. दिल्ली एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

सिन्हा यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती.  त्यांना एम्समध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मंगळवारी रात्री ९.२० च्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले. 

सिन्हा या २०१७ पासून कॅन्सरशी झुंझत होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतू अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या मुलाने आता त्या वाचू शकत नाहीत, लोकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी असे म्हटले होते. 

शारदा सिन्हा यांनी भोजपुरी आणि मैथिली भाषेत अनेक लोकगीते गायली. बॉलीवूडमध्ये त्यांनी सलमान खानच्या 'मैने प्यार किया' चित्रपटातील एका गाण्यालाही आपला आवाज दिला आहे. त्यांना 1991 मध्ये 'पद्मश्री' आणि 2018 मध्ये 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Web Title: Bihar singer Sharda Sinha passes away; She was admitted to AIIMS due to cancer  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Biharबिहार