Video - संतापजनक! तक्रारदार महिलेकडून पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याने करून घेतला मसाज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 12:16 PM2022-04-29T12:16:09+5:302022-04-29T12:20:19+5:30

तक्रारदार महिलेकडून पोलीस ठाण्यात असलेल्या एका अधिकाऱ्याने मसाज करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

bihar sub inspector got massaged in police station by complainant woman sp suspended after video went viral | Video - संतापजनक! तक्रारदार महिलेकडून पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याने करून घेतला मसाज

Video - संतापजनक! तक्रारदार महिलेकडून पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याने करून घेतला मसाज

googlenewsNext

पाटणा - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. तक्रारदार महिलेकडून पोलीस ठाण्यात असलेल्या एका अधिकाऱ्याने मसाज करून घेतल्याचा भयंकर प्रकार उघड झाला आहे. बिहारमधील सहरसा जिल्ह्यातील नवहट्टा ब्लॉक अंतर्गत एका पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी तक्रारदार महिलेकडून तेलाने मालिश करून घेत असल्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये इन्स्पेक्टर शशिभूषण सिंह फोनवर कोणाशी तरी बोलत आहेत, तर महिला त्यांना तेलाने मसाज करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन अधिकारी शशिभूषण सिंह यांनी महिलेच्या असहायतेचा चुकीचा फायदा घेत बॉडी मसाज करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अधिकाऱ्याच्या संभाषणावरून असे दिसते की महिला अडचणीत आहे आणि अधिकारी तिचे काम करून देण्याच्या बदल्यात तिच्याकडून ही अशा प्रकराची सेवा करून घेत आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर पोलीस अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्याचे एसपी लिपी सिंह यांनी अधिकारी शशिभूषण सिंह यांना निलंबित केले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये पिवळी साडी घातलेली एक महिला त्यांना मसाज करत आहे तर दुसरी महिला त्यांच्या समोर बसलेली दिसत आहे. पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या कोणीतरी हा व्हिडीओ काढला असून आता तो व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: bihar sub inspector got massaged in police station by complainant woman sp suspended after video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस