"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी लोकप्रियता पाहून टिकटॉकवर बंदी घातली...!"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 07:16 PM2021-08-09T19:16:29+5:302021-08-09T19:19:13+5:30
"काही लोकांना वाटते, की राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) तिकीट कोट्यवधी रुपये देऊन मिळवले जाऊ शकते आणि निवडणूक लढविली जाऊ शकते. मात्र, त्यांना हे लक्षात असायला हवे, की हा गरीब लोकांचा पक्ष आहे."
पाटणा - बिहारची राजधानी पाटणा येथे विद्यार्थी राजदच्या कार्यक्रमापूर्वी सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव नाही. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी लावलेल्या पोस्टरमध्ये तेजस्वी यादव यांना स्थान न दिल्यानंतर, रविवारी झालेल्या कार्यक्रमात लालू प्रसादचा मोठा मुलगा तेज प्रताप यांनी त्यांच्याच पक्षाच्या अध्यक्षाला हिटलर म्हणून संबोधित केले. एवढेच नाही, तर इंटरनेट मिडियावरही ते प्रचंड संतापले आणि बिहारमध्ये इंटरनेट मिडियावरच बंदी घालायला हवी, कारण लोक त्याचा चुकीचा वापर करत आहेत. तसेच, माझी लोकप्रियता पाहूनच नरेंद्र मोदींनी टिकटॉकवर बंदी घातली आहे, असेही माजी आरोग्यमंत्री तेज प्रताप यांनी म्हटले आहे. याच बरोबर, काही लोक माझी चेष्टा करतात, वेळ आल्यावर त्यांनाही उत्तर दिले जाईल, असेही तेज प्रताप म्हणाले.
ममतांचा आरोप; "इतर कुणाची हिम्मत नाही, अमित शाहंनीच घडवून आणला पुतण्यावरील हल्ला"
विद्यार्थी राजदचे राज्यातील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, विद्यापीठ आणि विभागीय अध्यक्ष यांच्या एक दिवसीय बैठकीत तेज प्रताप यादव बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहिले, की आपल्या कन्हैया जींचे (तेज प्रताप) चाहते टिकटॉकवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. म्हणून त्यांनी त्यावर बंदी घातली. एवढेच नाही, तर अनेक लोक लालू प्रसाद, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांचे फोटो लावून इंटरनेट मीडियाचा गैरवापर करतात, हे योग्य नाही, नाही, असेही ते म्हणाले.
राजद गरीब जनतेचा पक्ष -
तेज प्रताप यादव म्हणाले, काही लोकांना वाटते, की राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) तिकीट कोट्यवधी रुपये देऊन मिळवले जाऊ शकते आणि निवडणूक लढविली जाऊ शकते. मात्र, त्यांना हे लक्षात असायला हवे, की हा गरीब लोकांचा पक्ष आहे. तसेच, काही लोक इंटरनेट माध्यमांवर माझी चेष्टा करतात. माझ्या विरोधात कट रचतात. मी त्यांना ओळखतो, पण नावे घेणार नाही. पण असा हेतू असलेल्यांच्या स्वप्नांचा मी चुराडा करीन.
"जीन्सवाल्यांना पक्षात नो एन्ट्री, जीन्स घालणारे काय राजकारण करणार?"; RJD नेत्याचं वादग्रस्त विधान