संतापजनक! 'जल्लाद हैं सारे, मेरे बाबू को मार डाला', पतीला गमावल्यावर महिलेने केले धक्कादायक खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 10:37 AM2021-05-12T10:37:36+5:302021-05-12T10:40:08+5:30

Bihar News : रोशनच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी रूचीने ज्याप्रकारे रडली आणि आलेले वाईट अनुभव सांगितले ते वाचून मनाला चटका बसतो.

Bihar : They killed my babu without oxygen the woman wept bitterly after losing her husband | संतापजनक! 'जल्लाद हैं सारे, मेरे बाबू को मार डाला', पतीला गमावल्यावर महिलेने केले धक्कादायक खुलासे

संतापजनक! 'जल्लाद हैं सारे, मेरे बाबू को मार डाला', पतीला गमावल्यावर महिलेने केले धक्कादायक खुलासे

Next

बिहारच्या मधुबनीमध्ये राहणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर रोशन चंद्र याचं कोरोनामुळे निधन झालं. पटणा येथील राजेश्वर हॉस्पिटलमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. याआधी भागलपूरच्या ग्लोकल हॉस्पिटलमध्ये त्याच्या उपचार सुरू होते. तिथे तब्येत आणखी बिघडल्याने त्याला पाटण्याला हलवण्यात आलं होतं. रोशनच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी रूचीने ज्याप्रकारे रडली आणि आलेले वाईट अनुभव सांगितले ते वाचून मनाला चटका बसतो. अंगावर शहारे आणणारे खुलासे करत रूचीने सांगितले की, पतीच्या उपचारासाठी तिला छेडछाडही सहन करावी लागली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रूचीने पटना येथील राजेश्वर हॉस्पिटलमधील एका डॉक्टरवर छेडछाड केल्याचा आरोप लावला आहे. सोबतच सांगितले की, तिच्या पतीला उपचारासाठी त्रास दिला गेला. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आरोप आहे की, हॉस्पिटलमधील लोक नेहमीच ऑक्सीजन सप्लाय बंद करत होते. जेणेकरून लोकांनी जास्त पैसे देऊन ऑक्सीजन विकत घ्यावं. रूचीनेही जास्त पैसे देऊन ऑक्सीजन खरेदी केलं. पण ती पतीला वाचवू शकली नाही. (हे पण वाचा : सलाम! स्वत:ला गंभीर आजार असताना दुसऱ्यांपर्यंत ऑक्सीजन पोहोचवणारा 'देवदूत')

रूचीने पुढे सांगितले की, ज्याप्रकारे तिच्या पतीचा मृत्यू झाला त्याप्रमाणे आता इतर कुणाचा मृत्यू होऊ नये अशी तिची इच्छा आहे. शेवटी रडत रडत ती म्हणाली की, डॉक्टरांच्या भरोशावर रूग्णांना सोडलं जाऊ शकत नाही. जल्लाद आहेत सारे, माझ्या बाबूला मारलं त्यांनी. (हे पण वाचा : माणुसकीला सलाम! आई वडिलांना कोरोना संसर्ग; महिला पोलिसानं ६ महिन्यांच्या बाळाचा केला सांभाळ)

ही घटना समोर आल्यावर प्रशासन खळबळून जागं झालं. भागलपूर एसएसपी गुडिया नताशा यांनी स्वत: ग्लोकल हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रकरणाची माहिती घेतली. सोबतच चौकशीचे आदेशही दिले. कथितपणे हॉस्पिटल प्रशासनाने आरोपी डॉक्टरला नोकरीहून काढलं. पण अजूनही या घटनेवर पूर्ण कारवाई होणं बाकी आहे. आशा आहे की, दोषींना शिक्षा मिळेल आणि कुणालाही रोशनप्रमाणे जीव गमवावा लागणार नाही.
 

Read in English

Web Title: Bihar : They killed my babu without oxygen the woman wept bitterly after losing her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.