Coronavirus Unlock: या राज्यात बुधवारपासून शाळा, कॉलेज सुरू होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 03:13 PM2021-07-05T15:13:00+5:302021-07-05T15:15:50+5:30
Bihar Unlock 4: देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाची लाट नियंत्रणात आली आहे. त्यामुळे अशा राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. बिहारमधील जनतेलाही अनलॉक ४ मध्ये मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
पाटणा - देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फैलाव आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाची लाट नियंत्रणात आली आहे. त्यामुळे अशा राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. (Bihar Unlock 4) बिहारमधील जनतेलाही अनलॉक ४ मध्ये मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. (Coronavirus Unlock ) बिहारमधील नितीश कुमार सरकारने अनलॉक ४ अंतर्गत शाळा-कॉलेजसह अन्य संस्थांना उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Schools and colleges will start functioning in the state from Wednesday, a big decision of the state government)
सोमवारी अनलॉक ४ बाबत माहिती देताना नितीश कुमार यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, कोरोनाच्या सद्यस्थितीची समीक्षा केल्यानंतर राज्यातील सरकारी आणि बिगर सरकारी कार्यालयांना उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या कार्यालयांमध्ये केवळ लसीकरण घेतलेल्या लोकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.
दरम्यान बिहार सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेताना ११वी आणि १२वीच्या वर्गांसह, कॉलेज, टेक्निकल इंस्टिट्युट आमि सरकारी प्रशिक्षण संस्थां ५० टक्के उपस्थितीसह उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय रेस्टॉरंट आणि अन्नपदार्थांची दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र रेस्टॉरंट्स आणि खाण्याच्या दुकानांमध्ये दुकानांच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच प्रवेश घेता येणार आहे.