बिहार, उ. बंगालला सौम्य भूकंपाचे हादरे

By admin | Published: December 19, 2014 04:32 AM2014-12-19T04:32:43+5:302014-12-19T04:32:43+5:30

बिहार, सिक्किम आणि उत्तर बंगालमधील दार्जिंलिंगच्या पर्वतीय भागात गुरुवारी रात्री सौम्य भूकंपाचे हादरे बसले

Bihar, Uttar Pradesh Severe earthquake holes in Bengal | बिहार, उ. बंगालला सौम्य भूकंपाचे हादरे

बिहार, उ. बंगालला सौम्य भूकंपाचे हादरे

Next

पाटणा : बिहार, सिक्किम आणि उत्तर बंगालमधील दार्जिंलिंगच्या पर्वतीय भागात गुरुवारी रात्री सौम्य भूकंपाचे हादरे बसले. बिहारमध्ये रात्री ९ वाजता पाटण्यासह काही भागात ५.२ रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचे हादरे जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली.
भूकंपाचे केंद्र नेपाळमध्ये असल्याचे हवामान विभागाचे संचालक ए.के. सेन यांनी सांगितले. पाटणा, दरभंगा, समस्तीपूर, किशनगंज, अररिया, मधुबनी या भागात किमान १० सेकंद हादरे जाणवले. त्यानंतर लोकांनी सुरक्षितस्थळी जाण्यासाठी एकच धावपळ केली. सुदैवाने कुठेही प्राणहानी किंवा संपत्तीचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

Web Title: Bihar, Uttar Pradesh Severe earthquake holes in Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.