लाच घेणाऱ्या बिहारी मंत्र्याचा राजीनामा
By admin | Published: October 12, 2015 11:39 PM2015-10-12T23:39:59+5:302015-10-12T23:39:59+5:30
जनता दलचे (यु.) नेते अवधेश कुशवाह यांनी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातून सोमवारी राजीनामा दिला. एका उद्योजकाकडून रविवारी ४ लाख रुपयांची लाच घेताना कुशवाह हे स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसले होते.
पाटणा : जनता दलचे (यु.) नेते अवधेश कुशवाह यांनी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातून सोमवारी राजीनामा दिला. एका उद्योजकाकडून रविवारी ४ लाख रुपयांची लाच घेताना कुशवाह हे स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसले होते.
जनता दलाचे (यु.) प्रमुख शरद यादव यांनी कुशवाह यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यांचा राजीनामा त्यांनी राज्यपालांकडे पाठवून दिला. भ्रष्टाचार अजिबात सहन केला जाणार नाही असा दावा जनता दलाने (यु) केला आहे. स्टिंग आॅपरेशनमध्ये कुशवाह उद्योजकाकडून ४ लाख रुपये घेताना दिसतात. बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार आल्यानंतर तुमचे काम करू असे आश्वासन कुशवाह यांनी त्या उद्योजकाला दिले होते. कुशवाह हे स्टिंग आॅपरेशनमध्ये उत्तर प्रदेशच्या उद्योगमंत्र्यांशीही बोलताना व ‘त्या’ उद्योजकाला मदत करण्यास सांगतानाही दिसतात. (वृत्तसंस्था)