लिची खाल्ल्याने बिहारमधील बालकांचा मृत्यू? जाणून घ्या खरे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 02:40 PM2019-06-14T14:40:22+5:302019-06-14T14:41:28+5:30
अक्यूट इंसेफेलाइटिस हा आजार नाही तर सिंड्रोम आहे. कारण हा व्हायरस, बॅक्टेरिया किंवा अन्य कोणत्यातरी कारणामुळे होतो.
लिची हे फळ उन्हाळ्याच्या शेवटी सर्वत्र मिळू लागते. मात्र हे फळ खाल्ल्याने बिहारमध्ये 54 लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यंदा जानेवारीपासून आतापर्यंत 179 या तापाचे संदिग्ध रुग्ण आढळले आहेत. या मुलांच्या मृत्यूमागे लिची जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. रिकाम्या पोटी लिची खाल्ल्याने मुले या रोगाची बळी पडल्याचे सांगितले जाते. खरेच लिचीमुळे या मुलांचा मृत्यू झाला का? जाणून घेऊया खरे खोटे.
एक्यूट कोरोनरी सिंड्रोम (AES) म्हणजे शरिरातील मुख्य मज्जासंस्थेला प्रभावित करतो. लहान मुलांची मज्जासंस्था कमजोर असल्याने त्यावर जास्त परिणाम होतो. सुरुवातीला जोरदार ताप येतो. यानंतर शरीर दुखणे, हालचालीवर परिणाम, मानसिक अस्वास्थता, बेशुद्ध होणे, आकड्या येणे, भीती, कोमामध्ये जाणे अशी लक्षणे दिसतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होतो. हा आजार जून ते ऑक्टोबर दरम्यान बळावतो.
हाइपोग्लाइसीमिया म्हणजेच लो-ब्लड शुगर खरे कारण
अक्यूट इंसेफेलाइटिस हा आजार नाही तर सिंड्रोम आहे. कारण हा व्हायरस, बॅक्टेरिया किंवा अन्य कोणत्यातरी कारणामुळे होतो. बिहारच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार 54 पैकी 80 टक्के मृत्यू हे हाइपोग्लाइसीमिया झाल्याचा संशय आहे. सायंकाळी जेवण न केल्याने रात्री हाइपोग्लाइसीमिया किंवा लो ब्लड शुगरची समस्या होऊ शकते. खासकरून त्या मुलांमध्ये ज्यांच्या स्नायूंमध्ये ग्लाइकोजन-ग्लूकोजची मात्रा कमी असते. ताकद निर्माण करणाऱ्या फॅटी अॅसिडचे रुपांतर ऑक्सीकरणात होते.
लिचीचे कनेक्शन काय?
'द लैन्सेट' नावाच्या मोडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालामध्ये लिचीचे प्राकृतीक रुप हाइपोग्लीसीन ए मध्ये मोडते. यामुळे शरीरात फॅटी अॅसिड बनविण्यास व्यत्यय येतो. यामुळे रक्तशर्करेचे प्रमाण घसरते आणि मेंदूशी संबंधीत आजार वाढू लागतो.
उपाशी पोटी लिची खाऊ नका...
सकाळी किंवा सायंकाळी उपाशीपोटी लिची न खाण्याचा सल्ला बिहारच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. बिहारमध्ये कुपोषित बालकांची संख्या जास्त आहे. यामुळे तेथील मुले कमजोर असतात. यामुळे या सिंड्रोमचा जादा परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.