बिहारमध्ये सत्तासंघर्ष!

By admin | Published: February 10, 2015 03:19 AM2015-02-10T03:19:09+5:302015-02-10T03:19:09+5:30

बिहारमधील सत्तासंघर्षातून घटनात्मक पेच वाढला असून, संयुक्त जनता दलाचे नवनिर्वाचित विधिमंडळ पक्षनेते नितीशकुमार आणि पक्षाचा आदेश धुडकावून मुख्यमंत्रिपदावर कायम राहणारे जितनराम मांझी

Bihar's ruling party! | बिहारमध्ये सत्तासंघर्ष!

बिहारमध्ये सत्तासंघर्ष!

Next

पाटणा/नवी दिल्ली : बिहारमधील सत्तासंघर्षातून घटनात्मक पेच वाढला असून, संयुक्त जनता दलाचे नवनिर्वाचित विधिमंडळ पक्षनेते नितीशकुमार आणि पक्षाचा आदेश धुडकावून मुख्यमंत्रिपदावर कायम राहणारे जितनराम मांझी यांच्यात आरपारची लढाई सुरू झाली आहे. उभयतांनी सोमवारी येथे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेऊन विश्वासमत आपल्याकडेच असल्याचा दावा केला. त्यामुळे आता राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
दरम्यान, संयुक्त जनता दलाने पक्षासोबत बंडाळी करून मुख्यमंत्रिपद सोडण्यास नकार देणारे आणि नितीशकुमार यांच्या मार्गातील काटा बनलेले जितनराम मांझी यांच्यावर बेशिस्त वागणुकीचा ठपका ठेवीत अखेर त्यांना बडतर्फ केले आणि ४८ तासांच्या आत मांझी यांना विधानसभेत शक्तिपरीक्षण करण्यास सांगण्यात यावे, अशी विनंती राज्यपाल त्रिपाठी यांना केली. मांझींनी विधानसभेत शक्तिपरीक्षणाशिवाय राजीनामा देण्यास नकार दिल्याने या पक्षातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. रविवारी मोदी यांची भेट घेतल्यापासून मांझी ज्या अविर्भावात बोलत आहेत त्यावरून त्याची पटकथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी लिहिली गेल्याचे स्पष्ट होते, असा जदयूचा आरोप आहे. संयुक्त जनता दलाने मांझी यांना बडतर्फ केल्यानंतर काही तासांतच राजद प्रमुख लालूप्रसाद यादव आणि शरद यादव यांच्यासमवेत माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यपाल त्रिपाठी यांची भेट घेऊन राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला. त्यांनी समर्थनार्थ १३० आमदारांची यादीही सादर केली.

> राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्यासोबत एक तासाची बैठक आटोपून राजभवनातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव, जदयूचे वरिष्ठ नेते नितीशकुमार व जदयूचे प्रमुख शरद यादव.

> सरकार स्थापनेची संधी नाकारल्यास अथवा चालढकल झाल्यास आम्ही सर्व १३० आमदारांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासमक्ष हजर करू. यासाठी आम्ही राष्ट्रपतींकडे ११ फेब्रुवारीची वेळ मागितली असल्याचे नितीशकुमार यांनी सांगितले.
१३० आमदार पाठीशी : संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि भाकपासह सर्व १३० आमदार राजभवनाबाहेर हजर होते. या सर्वांची ओळखपरेड करण्याची तयारी कुमार यांनी दर्शविली. परंतु राज्यपालांनी त्याची गरज नसल्याचे सांगितले.

> मांझींचा दावा : जितनराम मांझी ३ वाजता राजभवनावर धडकले. नितीशकुमार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड असंवैधानिक आहे. सभागृहात आपण बहुमत सिद्ध करू, असा दावा मांझींनी केला.

 

Web Title: Bihar's ruling party!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.