बिहारमध्ये ज्येष्ठ पत्रकाराची गोळ्या घालून हत्या

By admin | Published: May 13, 2016 09:39 PM2016-05-13T21:39:22+5:302016-05-13T21:39:22+5:30

बिहारमधल्या सिवान रेल्वे स्टेशनजवळ राजदेव रंजन या ज्येष्ठ पत्रकाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली

Bihar's senior journalist shotgun and murdered | बिहारमध्ये ज्येष्ठ पत्रकाराची गोळ्या घालून हत्या

बिहारमध्ये ज्येष्ठ पत्रकाराची गोळ्या घालून हत्या

Next

 ऑनलाइन लोकमत

पटना, दि. 13- बिहारमधल्या सिवान रेल्वे स्टेशनजवळ राजदेव रंजन या ज्येष्ठ पत्रकाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. 
राजदेव राजन हे हिंदुस्तान या हिंदी वर्तमानपत्राचे ब्युरो चिफ होते. राजदेव रंजन हे सिवानमधील रेल्वे स्टेशनजवळून स्वतःच्या गाडीवरून जात असताना एका गाडीवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्या डोक्यात आणि मानेवर गोळ्या झाडल्यात. यामध्ये राजदेव रंजन यांचा जागीच मृत्यू झाला.
गया इथल्या रस्त्यावर झालेल्या 12 वर्षांच्या मुलाच्या हत्येनंतर हे प्रकरणही सध्या खूपच चर्चेत आलं आहे. रंजन यांना 24 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव होता. या घटनेवर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत असून, बिहारमधले भाजपचे नेते सुशीलकुमार मोदींनी शोक व्यक्त केला आहे. 
 

Web Title: Bihar's senior journalist shotgun and murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.