बिहारचे बिगुल वाजले, हातमोजे घालून होणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 01:15 AM2020-09-26T01:15:25+5:302020-09-26T01:15:58+5:30

विधानसभा निवडणूक तीन टप्प्यांत; कोरोना संसर्ग टाळण्यासाठी निवडणूक आयोगाची जय्यत तयारी

Bihar's trumpets sounded, voting will be held wearing gloves | बिहारचे बिगुल वाजले, हातमोजे घालून होणार मतदान

बिहारचे बिगुल वाजले, हातमोजे घालून होणार मतदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात बिहारच्या विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शुक्रवारी जाहीर केले. २४३ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकांची मतमोजणी १० नोव्हेंबरला होईल. नितिश कुमार यांची जदयु आणि भाजपा यांची रालोआ विरुद्ध राजद-काँग्रेस यांचे महागठबंधन अशी रंगतदार लढत यंदा  पाहायला मिळणार आहे.


असे असतील तीन टप्पे
टप्पे तारीख जिल्हे जागा केंद्रे
पहिला २८ आॅक्टोबर १६ ७१ ३२ हजार
दुसरा ३ नोव्हेंबर १७ ९४ ४२ हजार
तिसरा ७ नोव्हेंबर १५ ७८ ३३ हजार

प्रचार करण्याचे आगळे नियम
च्फक्त पाच लोकांनीच एकत्र जाऊन घरोघरी प्रचारास परवानगी
च्रोड शोमध्ये जास्तीतजास्त पाच कारचा ताफा सहभागी होऊ शकेल
च्उमेदवारी अर्ज भरताना उमेदवार व त्याच्या सोबत एक व्यक्ती
कोरोना रुग्णांसाठी मतदानाची खास सोय
कोरोना रुग्ण आरोग्य अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन शेवटच्या टप्प्यात मतदान केंद्रात मतदान करू शकतील. त्यांना व ८० वर्षांपुढील वृद्धांना टपालाद्वारे मतदानाची सुविधा दिलेली आहे.

Web Title: Bihar's trumpets sounded, voting will be held wearing gloves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.