इंजिनिअर पतीला नक्षलवाद्यांनी पकडून नेलं, शोधात मुलाला घेऊन जंगलात निघाली पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 12:23 PM2021-11-13T12:23:53+5:302021-11-13T12:24:25+5:30

आता इंजिनिअरच्या शोधात त्याची पत्नी आपल्या लहान मुलाला घेऊन जंगलात गेली आहे. तिने नक्षलवाद्यांना विनंती केली आहे की, त्यांनी तिच्या पतीला सुखरूप सोडावं.

Bijapur : Naxalites caught engineer husband wife came out to forest with child in search | इंजिनिअर पतीला नक्षलवाद्यांनी पकडून नेलं, शोधात मुलाला घेऊन जंगलात निघाली पत्नी

इंजिनिअर पतीला नक्षलवाद्यांनी पकडून नेलं, शोधात मुलाला घेऊन जंगलात निघाली पत्नी

Next

छत्तीसगढच्या बीजापूरमध्ये रस्त्याच्या कामाचं निरीक्षण करण्यासाठी गेलेल्या एका इंजिनिअरचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलं. त्याच्यासोबत एक चपराशीही होता. दुपारी एक वाजता निघाले तरी परत आले नसल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. पण त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. आता इंजिनिअरच्या शोधात त्याची पत्नी आपल्या लहान मुलाला घेऊन जंगलात गेली आहे. तिने नक्षलवाद्यांना विनंती केली आहे की, त्यांनी तिच्या पतीला सुखरूप सोडावं.

सब इंजिनिअर अजय रोशन लकडा बीजापूरच्या पीएमजीएसवायमध्ये कार्यरत आहे. तो गुरूवारी दुपारी एक वाजता चपराशी लक्ष्मणसोबत गोरना मनकेली भागातील रस्त्याच्या कामाचं निरीक्षण करण्यासाठी गेला होता. मात्र दोघेही मुख्यालयात परत आले नाहीत. विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना शोधलं. पण त्यांचा काही पत्ता लागला नाही.

ग्रामीण लोकांनी विभागीय अधिकाऱ्यांना माहिती दिली की, काही लोक सब इंजिनिअर आणि चपराश्याला जंगलाकडे घेऊन गेले. आणखी माहिती मिळवल्यावर समजलं की नक्षलवाद्यांनी दोघांचं अपहरण केलं. यानंतर  इंजिनिअरच्या परिवाराला धक्का बसला. त्याची पत्नी अर्पिताने नक्षलवाद्यांना अपील केलं आहे की, पत्नीला सुखरूप सोडा.

अर्पिताने नक्षलवाद्यांकडे विनंती केली आहे की, त्यांनी एका बहिणीची विनंती मान्य करावी. माणूसकी दाखवावी. माझा पती एक चांगला माणूस आहे. जेव्हापासून त्यांचं अपहरण झाल्याचं समजलं तेव्हापासून आम्ही काहीच खाल्लं नाही. मला ३ वर्षांचा मुलगा आहे. त्यालाही त्याच्या वडिलांची आठवण येत आहे. त्यांना सोडून द्या. ही एका पत्नी आणि आईची विनंती आहे.

एक दिलासादायक बातमी म्हणजे चपराशी लक्ष्मण परतागिरी सुखरूप आपल्या घरी पोहोचला आहे. पण अजूनपर्यंत त्याने काहीच सांगितलं नाहीये. चपराश्याने सांगितलं की, त्या दोघांनाही वेगवेगळं ठेवण्यात आलं होतं. जंगलात जनता कोर्ट भरवलं होतं. त्यानंतर त्याला परत सोडलं. पण इंजिनिअर साहेबांना सोडलं नाही.

पोलीस इंजिनिअरचा शोध घेत आहेत. एसपी कमलोचन कश्यप म्हणाले की, सब इंजिनिअरचा शोध घेतला जात आहे. एक-दोन दिवसात नक्षलवादी त्यांना सोडून देण्याची शक्यता आहे.दुसरीकडे सब इंजिनिअरची पत्नी अर्पिता मनकेली भागात आपल्या मुलाला सोबत घेऊन नक्षलवाद्यांना भेटायला निघाली आहे. 
 

Web Title: Bijapur : Naxalites caught engineer husband wife came out to forest with child in search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.