Video - "मत दिलं नाही तर मी काम करणार नाही, सबका साथ-सबका विकास हा मुद्दा चालणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 03:09 PM2024-07-08T15:09:41+5:302024-07-08T15:10:08+5:30
उत्तर प्रदेशच्या नगीना लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत पराभूत झालेले भाजपाचे नहटौर आमदार ओम कुमार यांचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेशच्या नगीना लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत पराभूत झालेले भाजपाचे नहटौर आमदार ओम कुमार यांचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भाजपा आमदार म्हणत आहेत की, मत दिलं नाही तर मी काम करणार नाही. सबका साथ-सबका विकास हा मुद्दा चालणार नाही. यावेळी त्यांनी नगिनाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.
बिजनौर जिल्ह्यातील नहटौर मतदारसंघाचे आमदार ओम कुमार म्हणाले की, आता 'सबका साथ-सबका विकास'चा मुद्दा चालणार नाही, जो मत देईल त्याचच काम करणार. गुंडगिरीचं लायसन्स मिळावं म्हणून काही लोकांनी मत दिलं नाही. पण त्यांना गुंडगिरीचं लायसन्स देणार नाही आणि अशा लोकांवर कारवाई केली जाईल.
विधानसभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार पुढे म्हणाले की, "जो अधिकारी कार्यकर्त्यांचं ऐकणार नाही त्याला जिल्ह्यात राहू देणार नाही. तुम्हाला (कार्यकर्त्यांना) फक्त काम सांगायचं आहे, तुमचं काम झालं नाही तर अधिकारीही जिल्ह्यात राहणार नाही."
अब काम उसी का होगा…..जो वोट देगा
— स्वतंत्र आवाज़ (@AazadSpeaker) July 8, 2024
एक मजहब को छोड़ सब हमे वोट देते हैं अब वोट ना देने वालों के काम नहीं होंगे।
: ओम कुमार, BJP विधायक, विधानसभा नहटौर (बिजनोर) यूपी
सहमत / असहम विचार जरूर रखे। pic.twitter.com/xzD1uzJE4Y
"जो गुंडांना पाठिंबा देईल त्यालाही गुंडांसारखे वागवले जाईल, कारण उत्तर प्रदेशात योगी सरकार आहे आणि दिल्लीत मोदी सरकार आहे. इथे गुंडांना असा धडा शिकवला जातो की त्यांच्या पुढच्या तीन पिढ्यांनाही तो आठवतो."
नगीना लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या चंद्रशेखर आझाद यांचाही आमदार ओम कुमार यांनी खरपूस समाचार घेतला. नाव न घेता म्हटलं की, काही लोक कावड यात्रा थांबवण्याचं बोलतात, तर आम्ही म्हणतो, हिंमत असेल तर कावड यात्रा थांबवून दाखवा. कावड यात्रा जिल्ह्यात प्रवेश करताच आम्ही आणि आमचे लोक त्यात सहभागी झालेल्या लोकांचा पूर्ण आदर करू.
आमदार ओमकुमार यांनी नगीना राखीव जागेवरून लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, निवडणुकीत पराभूत झाल्यापासून ओम कुमार सातत्याने विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत.