बाइक अन् बोट... महाकुंभ मेळ्यात तरुणांची छप्परफाड कमाई, बाइक टॅक्सीसाठी अनेकांनी रोजगारातून घेतली सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 05:03 IST2025-02-20T05:01:32+5:302025-02-20T05:03:35+5:30

महाकुंभाचा अखेरचा टप्पा सुरू असूनही दररोज सरासरी कोटींहून अधिक भाविक त्रिवेणी संगमावर स्नानासाठी येत आहेत. यात स्थानिकांनी अर्थकारणदेखील साधले आहे.

Bike and boat... Youth earn skyrocketing income at Mahakumbh Mela, many take leave from employment for bike taxi | बाइक अन् बोट... महाकुंभ मेळ्यात तरुणांची छप्परफाड कमाई, बाइक टॅक्सीसाठी अनेकांनी रोजगारातून घेतली सुट्टी

बाइक अन् बोट... महाकुंभ मेळ्यात तरुणांची छप्परफाड कमाई, बाइक टॅक्सीसाठी अनेकांनी रोजगारातून घेतली सुट्टी

योगेश पांडे

प्रयागराज : महाकुंभाचा अखेरचा टप्पा सुरू असूनही दररोज सरासरी कोटींहून अधिक भाविक त्रिवेणी संगमावर स्नानासाठी येत आहेत. यात स्थानिकांनी अर्थकारणदेखील साधले आहे. विशेषत: प्रचंड वाहतूककोंडीमुळे मोठ्या वाहनांना शहरात प्रवेश बंद असल्याने कोट्यवधी भाविकांसाठी स्थानिक दुचाकीस्वार तरुण हेच सारथी झाले. अनेकांनी महिन्याभरात यातून लाखोंची कमाई केली आहे. पवित्र संगमावर जाण्यासाठी नाव चालविणाऱ्या नावाड्यांनाही अच्छे दिन आले आहेत.

‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत बहुतांश भाविक हे सरासरी १५ ते २० किलोमीटर पायीच चालत असल्याचे दिसले. महाशिवरात्रीच्या अगोदर पवित्र स्नान व्हावे यासाठी मिळेल त्या साधनाने भाविक प्रयागराजला पोहोचत आहेत. पवित्र संगमावर पोहोचण्यासाठी स्थानिक वाहतूक व्यवस्थाच नसल्याने अडचण होत आहे. 

३०० ते ४०० रुपये भाडे

दुचाकीस्वार चारशे ते हजार रुपये भाडे आकारतात. यातून दिवसभरात तीन ते चार हजार रुपये कमाई होते.

बोटिंगचे दर दहापट

महाकुंभ प्रशासनाकडून बोटिंगसाठी ४५ रुपये ते १२५ रुपये इतके दर निश्चित करण्यात आले. मात्र, गर्दी लक्षात घेता नावाडी व बोट कंत्राटदारांकडून तब्बल दहा पटींहून अधिक दर आकारण्यात येत आहेत. ‘लोकमत’च्या पाहणीत एका व्यक्तीकडून १३०० ते १६०० रुपये घेण्यात येत असल्याचे समोर आले.

Web Title: Bike and boat... Youth earn skyrocketing income at Mahakumbh Mela, many take leave from employment for bike taxi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.