बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 06:12 AM2024-09-27T06:12:00+5:302024-09-27T06:12:08+5:30

राज्य सरकारविरुद्ध केलेल्या काही टिप्पणीबाबत निकालाचा फेरआढावा घेण्याची विनंती

Bilkis Bano case no need for review Supreme Court rejected the Gujarat government petition | बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका

बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका

नवी दिल्ली : बिल्किस बानाे प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयाने राज्य सरकारविरुद्ध केलेल्या काही टिप्पणीबाबत निकालाचा फेरआढावा घेण्याची विनंती करणारी गुजरात सरकारची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली.

न्यायालयाने २००२च्या दंगलीतील या प्रकरणात बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सात सदस्यांच्या हत्येत दोषी ठरलेल्यांना शिक्षेत सूट दिल्याप्रकरणी राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. न्या. बी. व्ही. नागरत्ना व न्या. उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने ही याचिका लोकन्यायालयात वर्ग करण्यासंबंधीची विनंतीही फेटाळली.

खंडपीठाने म्हटले की, ही  याचिका, आव्हान दिला गेलेला आदेश आणि त्यासंबंधीच्या दस्तऐवजांचा  आढावा घेतल्यानंतर आम्ही या निष्कर्षावर आलो आहोत की, यात कोणत्याही उणिवा नाहीत. शिवाय फेरआढाव्यासंबंधीच्या याचिकेतही यावर पुनर्विचार केला जावा असे कायदेशीर मुद्दे नाहीत.
 

Web Title: Bilkis Bano case no need for review Supreme Court rejected the Gujarat government petition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.