लोकसभेत आधार विधेयक मंजूर
By admin | Published: March 11, 2016 05:39 PM2016-03-11T17:39:49+5:302016-03-11T17:53:01+5:30
लोकसभेमध्ये विरोधकांच्या गोंधळामध्ये शुक्रवारी आधार विधेयक मंजूर करण्यात आले.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - लोकसभेमध्ये विरोधकांच्या गोंधळामध्ये शुक्रवारी आधार विधेयक मंजूर करण्यात आले. हे विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी विरोधक करत होते. अनुदान आणि अन्य सेवांचा नेमक्या लाभार्थ्यांना फायदा पोहोचवणे हा या विधेयकाचा उद्देश आहे.
सविस्तर चर्चेनंतर आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करण्यात आले. आधार कार्डासाठी जी माहिती देण्यात येईल त्याचा अजिबात गैरवापर होणार नाही असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सभागृहाला दिले.
आधार कार्डाच्या माध्यमातून एलपीजी ग्राहकांना देण्यात येणा-या अनुदानामुळे केंद्र सरकारचे १५ हजार कोटी रुपये वाचल्याचे जेटली यांनी सभागृहाला सांगितले.