बिल गेट्स यांनी कोरोनाला रोखण्याचे सुचविले उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 04:24 AM2020-03-04T04:24:10+5:302020-03-04T07:36:38+5:30
या देशांतील आरोग्य संघटना आणि इतर व्यवस्था तेवढ्या विकसित नाहीत त्यामुळे कोरोना व्हायरसच्या उद्रेकाचा त्यांच्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.
नवी दिल्ली : स्वत:च्या देशात काम करतानाच दाता सरकारांनी (डोनर गव्हर्नमेंटस) कमी आणि मध्यम उत्पन्नाच्या देशांवरही लक्ष केंद्रीत केले पाहिजे. हे देश अशा साथीच्या आजारांना तोंड देण्यास राजकीय, आर्थिकदृष्ट्या तयार नाहीत. या देशांतील आरोग्य संघटना आणि इतर व्यवस्था तेवढ्या विकसित नाहीत त्यामुळे कोरोना व्हायरसच्या उद्रेकाचा त्यांच्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. गेटस म्हणाले की, कोरोना व्हायरसवरील लसी आणि उपचारांनाही गती मिळायला हवी. कोरोनाचा विषाणू कसा तयार झाला याचा क्रम लावण्याचे काम शास्त्रज्ञांना करता आल्यामुळे त्यावरील लसी या वैद्यकीय चाचण्यांसाठी लवकरच तयार असतील. प्रशिक्षित आरोग्य कार्यकर्ते लसी देण्याच्या कामाशिवाय आजाराच्या संरचनेलाही अटकाव करण्याचे काम करू शकतील. कोरोना व्हायरसवर देखरेख करण्यासाठी गुंतवणुकीची आणि केस डाटाबेसची गरज आहे. ही माहिती संपूर्ण देशभर दिली व घेतली जावी.
साथीचे आजार/रोग फैलावल्यावर प्रथिने तयार होण्याचे काम मंदगतीने होते त्यामुळे प्रथिने तयार होतील अशा जुन्या पद्धतींना सुधारण्याची गरज आहे.
सरकारांनी आणि उद्योगांच्या नेत्यांनी अँटी व्हायरल्स आणि लसींची विक्री सगळ््यात मोठ्या निविदाधारकाला न करता रोग सर्वत्र पसरलेला असताना परवडणाऱ्या दरांत केली पाहिजे. सरकार तसेच दात्यांनी लोकांना औषधे प्राप्त करून त्यांच्या वितरणासाठी पैसा उपलब्ध करून द्यावा. बिल गेट्स म्हणाले की, मी आणि मेलिंदा गेटस हिने १०० दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली आहे. याचा उपयोग विकसनशील देश कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यास वापरू शकतील.