भारतीय डॉक्टरांसाठी अमेरिकी संसदेत मांडले विधेयक
By admin | Published: April 25, 2015 10:16 AM2015-04-25T10:16:56+5:302015-04-25T12:39:42+5:30
उच्चशिक्षित डॉक्टर्सची कमतरता जाणवत असल्याने भारत व पाकिस्तानातील डॉक्टरांना अमेरिकेत आणण्याचे प्रयत्न सुरू असून यासाठी अमेरिकी संसदेत खास विधेयक सादर करण्यात आले
Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २५ - उच्चशिक्षित डॉक्टर्सची कमतरता जाणवत असल्याने भारत व पाकिस्तानातील डॉक्टरांना अमेरिकेत आणण्याचे प्रयत्न सुरू असून यासाठी अमेरिकी संसदेत खास विधेयक सादर करण्यात आले आहे. परदेशातील डॉक्टरांना अमेरिकत काम करण्यासाठी व्हिसा मंजुरीच्या प्रक्रियेला वेग देणारे हे विधेयक आहे.
भारतात दहा हजार लोकांमागे ६ तर पाकिस्तानात ८ डॉक्टर आहेत, त्या तुलनेने अमेरिकेत हीच संख्या २४ आहे. मात्र असे असले तरी अमेरिकेला डॉक्टरांची आणखी गरज भासत असून , त्याच पार्श्वभूमीवर हे विधेयक सादर करण्यात आले. जीआरएडी ( ग्रॅट रेसिडन्सी फॉर अॅडिनशनल डॉक्टर्स) कायदा नावाचे हे विधेयक शुक्रवारी ग्रेस मेग (डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार ) व टॉम एम्मर ( रिपब्लिक पक्षाचे खासदार) यांनी सादर केले. या विधेयकामुळे परदेशी डॉक्टरांच्या व्हिसा मंजुरीच्या प्रक्रियेला गती देण्याचे अधिकार राज्य विभागांना मिळणर असून त्यामुळे अन्य देशातील डॉक्टरांचा अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये काम करण्याचा मार्ग मोकळा होईल.
परदेशातील डॉक्टरांना तात्पुरत्या कालावधीसाठी अमेरिकी दूतावासातातून 'जे-१' व्हिसा दिला जातो, मात्र ती प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने तो व्हिसा मिळण्यास उशीर होतो. त्यामुळे अनेक डॉक्टर अमेरिकेत येण्यास नाखूश असतात. हीच बाब लक्षात घेऊन व्हिसा मिळण्याची ही प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असून त्याचाच एक भाग म्हमून हे विधेयक सादर करण्यात आले.