लग्नासाठीचं मुलींचं किमान वय वाढणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 08:42 AM2021-12-16T08:42:12+5:302021-12-16T08:42:35+5:30

कॅबिनेटमध्ये विधेयकाला मंजुरी; हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडलं जाण्याची दाट शक्यता

bill may be introduced in this session to increase the age of marriage of girls | लग्नासाठीचं मुलींचं किमान वय वाढणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

लग्नासाठीचं मुलींचं किमान वय वाढणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

googlenewsNext

नवी दिल्ली: मुलीचं लग्नासाठीचं किमान वय वाढवण्याशी संबंधित एका विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबद्दलचे संकेत दिले होते. मुलींचं लग्नाचं किमान वय सध्या १८ वर्ष आहे. ते वाढवून २१ करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठीची तयारी सरकारनं सुरुवात केली आहे. याबद्दलचं विधेयक याच अधिवेशनात मांडलं जाण्याची शक्यता आहे. सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे.

लग्नाचं किमान वय वाढवण्यासाठी बाल विवाह कायद्यात सुधारणा केली जाईल. या कायद्यात सध्या मुलींचं लग्नासाठी किमान वय १८ वर्षे आहे. कायद्यात बदल करण्यासाठी सुधारणा विधेयकाला बुधवारी झालेल्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. 

मुलींच्या लग्नासाठीच्या किमान वयाबद्दल निर्णय घेण्यासाठी गेल्या वर्षी एका टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. त्या टास्क फोर्सनं लग्नासाठीचं किमान वय १८ वर्षावरून २१ वर्षे करण्याचा सल्ला दिला होता. माजी खासदार जया जेटलींच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनी देशाला लाल किल्ल्यावरून संबोधित केलं. त्यावेळी मोदींनी भाषणात लग्नासाठीचं किमान वय वाढवण्याबद्दल संकेत दिले होते. सध्याची परिस्थिती पाहता लग्नाचं वय वाढवण्यासंदर्भात विचार व्हायला हवा, असं मोदी म्हणाले होते.

Read in English

Web Title: bill may be introduced in this session to increase the age of marriage of girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.