‘मुंबई हायकोर्ट’ नावासाठी विधेयक, आगामी अधिवेशनात मांडण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 03:29 AM2018-11-19T03:29:49+5:302018-11-19T03:30:05+5:30
सव्वाशे वर्षांपूर्वी ब्रिटिश आमदानीत स्थापन झालेल्या बॉम्बे, कलकत्ता व मद्रास या तीन सर्वात जुन्या उच्च न्यायालयांची नावे शहरांच्या बदललेल्या नावानुरूप बदलण्यासाठीचे विधेयक संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे.
Next
नवी दिल्ली : सव्वाशे वर्षांपूर्वी ब्रिटिश आमदानीत स्थापन झालेल्या बॉम्बे, कलकत्ता व मद्रास या तीन सर्वात जुन्या उच्च न्यायालयांची नावे शहरांच्या बदललेल्या नावानुरूप बदलण्यासाठीचे विधेयक संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे.
या उच्च न्यायालायंची नावे अनुक्रमे मुंबई, कोलकाता व चेन्नई अशी बदलण्यासाठी याआधी जुलै २०१६ मध्ये लोकसभेत मांडण्यात आले होते. मात्र तमिळनाडू, कोलकातासाठी आता सुधारित विधेयक मांडावे लागणार आहे.