Eucalyptus Farming: या झाडांच्या लागवडीतून होऊ शकते कोट्यवधींची कमाई, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 01:44 PM2022-07-07T13:44:02+5:302022-07-07T13:44:32+5:30
Eucalyptus Farming: भारतामध्ये हरियाणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, बिहार, केरळ, गुजरात, पश्चिम बंगाल, गोवा, महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये निलगिरीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. या झाडांचा वापर हा फर्निचरपासून पार्टिकल बोर्ड आणि इमारती तयार करण्यासाठी केला जातो.
नवी दिल्ली - शेती फायद्याची करण्यासाठी गेल्या काही काळात विविध मार्ग अवलंबले जात आहेत. त्यातून शेतीत नवनवे प्रयोग केले जात आहेत. अशाच निलगिरीच्या झाडांची शेती. भारतामध्ये हरियाणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, बिहार, केरळ, गुजरात, पश्चिम बंगाल, गोवा, महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये निलगिरीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. या झाडांचा वापर हा फर्निचरपासून पार्टिकल बोर्ड आणि इमारती तयार करण्यासाठी केला जातो.
या झाडांची लागवड कुठल्याही प्रकारच्या जमिनीत करता येते. पण ६.५ ते ७.५ च्या दरम्यान पी.एच. असलेल्या जमिनीत या झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होते. या झाडांदरम्यान, कमी काळाता अधिक नफा देणाऱ्या इतर झाडांची लागवडही करता येते. या झाडांदरम्यान, तुम्ही हळद, आले आणि लसुणीसारख्या पिकांची लागवड करता येऊ शकते.
या झाडांच्या लागवडीमुळे पाणी पातळी खाली जात असल्याने या झाडांच्या लागवडीला सरकारकडून प्रोत्साहित केले जात नाही. मात्र शेतकरी वैयक्तिक पातळीवर या झाडांची लागवड करू शकतात. या झाडांची एक एकरमध्ये लागवड केल्यास दहा वर्षांत एक कोटीपर्यंत नफा होऊ शकतो.
निलगिरीच्या झाडांची पूर्ण वाढ होण्यासाठी १० ते १२ वर्षे लागतात. या लागवडीसाठी खर्चही कमी येतो. झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर एका झाडाचं वजन हे ४०० किलोच्या आसपास असते. एक हेक्टरमध्ये एक ते दीड हजार झाडांची लागवड होऊ शकते. पूर्ण वाढ झालेल्या झाडांच्या विक्रीतून ७० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते.