Corona Vaccination: मोठी बातमी! जगातील सर्वात स्वस्त लस भारतात येणार?; कोरोना लसीकरणाचा वेग वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 12:16 PM2021-06-03T12:16:43+5:302021-06-03T12:17:25+5:30

Corona Vaccination: केंद्र सरकार आणि बायोलॉजिकल-ई कंपनीसोबत महत्त्वाचा करार; ३० कोटी डोस मिळणार

Biological E Vaccine Booked By Government Check Clinical Trials Update Price Dose Pattern | Corona Vaccination: मोठी बातमी! जगातील सर्वात स्वस्त लस भारतात येणार?; कोरोना लसीकरणाचा वेग वाढणार

Corona Vaccination: मोठी बातमी! जगातील सर्वात स्वस्त लस भारतात येणार?; कोरोना लसीकरणाचा वेग वाढणार

Next

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं बायोलॉजिकल-ई सोबत एक महत्त्वाचा करार केला आहे. सरकारनं कंपनीला ३० कोटी रुपये रक्कम आगाऊ दिली आहे. त्याबदल्यात कंपनी ३० कोटी डोस राखीव ठेवणार आहे.

आता येणार कोरोना लसींचा पूर? तब्बल ६० विविध लसी ‘क्लिनिकल ट्रायल’मध्ये

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ दरम्यान बायोलॉजिकल-ई कंपनी लसींचा साठा करेल. बायोलॉजिकल-ई तयार करत असलेली लस आरबीडी प्रोटिन सब युनिट प्रकारातील आहे. यामध्ये SARS-CoV-२ चे रिसेप्‍टर-बायडिंग डोमेन (RBD)  डिमेरिक स्वरुपाचा वापर अँटिजेन म्हणून करण्यात आला आहे. लसीची क्षमता वाढवण्यासाठी त्यात एक CpG १०१८ चा वापर करण्यात आला आहे. या लसीचे दोन डोस घ्यावे लागतील. यामधलं अंतर २८ दिवसांचं असेल. त्यामुळे लसीकरण लवकर पूर्ण होऊ शकेल.

हाफकिनची लस थेट पुढच्या वर्षी बाजारात येणार; विविध परवानग्यासाठी अद्याप अर्जच नाहीत

बायोलॉजिकल-ई कंपनीला २४ एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्याची मंजुरी मिळाली. कंपनीनं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या नोव्हेंबर २०२० मध्ये सुरू केल्या. ३६० जणांवर करण्यात आलेल्या चाचणीबद्दलची आकडेवारी कंपनीनं जाहीर केलेली नाही. चाचण्यांचे निष्कर्ष सकारात्मक असल्याची त्रोटक माहिती कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका महिमा डाटला यांनी दिली आहे. आता तिसऱ्या टप्प्यात देशातील १५ ठिकाणी १ हजार २६८ जणांवर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या केल्या जातील. याशिवाय संपूर्ण जगातलही कंपनी चाचण्या घेईल.

केंद्र सरकार ३० डोससाठी कंपनीला १५०० कोटी रुपये देणार आहे. म्हणजेच एका डोससाठी सरकार ५० रुपये मोजेल. बाजारात ही लस कितीला मिळेल याबद्दल नेमकी माहिती उपलब्ध नाही. मात्र ही जगातील सर्वात स्वस्त लस असण्याची दाट शक्यता आहे. एका वृत्तानुसार, लसीच्या एका डोसची किंमत १.५ डॉलर प्रति डोस (११० रुपये) असू शकते. भारतात तयार झालेली कोविशील्ड लस ६५० रुपये आहे. 

Web Title: Biological E Vaccine Booked By Government Check Clinical Trials Update Price Dose Pattern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.