गुजरातमध्ये भूकंप; बिपरजॉयमुळे राज्यात अलर्ट जारी, हजारोंचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 06:58 PM2023-06-14T18:58:59+5:302023-06-14T18:59:27+5:30

गुजरातच्या कच्छमध्ये सायंकाळी 5 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

Biparjoy Cyclone: Earthquake in Gujarat; Alert issued in the state due to Biparjoy, evacuation of thousands to safe places | गुजरातमध्ये भूकंप; बिपरजॉयमुळे राज्यात अलर्ट जारी, हजारोंचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

गुजरातमध्ये भूकंप; बिपरजॉयमुळे राज्यात अलर्ट जारी, हजारोंचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

googlenewsNext


Biparjoy Cyclone: बिपरजॉय वादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये यंत्रणा अलर्टवर आहेत. यादरम्यान, गुजरातच्या कच्छमध्ये बुधवारी सायंकाळी 5.5 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.5 इतकी होती. यापूर्वी, दुपारी 4.15 वाजता जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड भागातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. याची तीव्रता 3.4 इतकी होती.

भूकंपाचे केंद्र नैऋत्येला 5 किमी अंतरावर होते. विशेष म्हणजे, मंगळवारी दुपारीही राजधानी दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. भारतासह पाकिस्तान आणि चीनमध्ये या भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआर, जम्मू काश्मीर, चंदीगडसह भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचा प्रभाव होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.4 इतकी मोजली गेली.

चक्रीवादळ गुजरातसाठी चिंतेचा विषय 
बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातसाठी चिंतेचा विषय बनला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र झाल्यानंतर आता गुजरातकडे येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ उद्या (गुरुवार) 15 जून रोजी राज्यात धडकणार आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफच्या 17 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. कच्छमध्ये 4, द्वारका आणि राजकोटमध्ये 3-3, जामनगरमध्ये 2 आणि पोरबंदरमध्ये 1 टीम तैनात आहे. बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातमधील पोरबंदर आणि द्वारकाच्या समुद्र किनाऱ्यावरून जाऊ शकते.

45 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले
बिपरजॉयमुळे गुजरात महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय वेगाने गुजरातकडे सरकत आहे. या वादळाचा सामना करण्यासाठी द्वारका, कच्छ, पोरबंदर, नवसारीसह अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत 45 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. याशिवा, अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. काही भागात कलम 144 लागू करण्यात आली आहे.

Web Title: Biparjoy Cyclone: Earthquake in Gujarat; Alert issued in the state due to Biparjoy, evacuation of thousands to safe places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.