Biparjoy Cyclone: गुजरातमध्ये बिपरजॉयचं थैमान; मुक्या प्राण्यांचा मृत्यू, 22 जण जखमी...; शेकडो गावांची 'बत्ती गुल'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 09:33 AM2023-06-16T09:33:48+5:302023-06-16T09:36:32+5:30
हे वादळ समुद्र किनाऱ्यावर पोहोचताच त्याने थैमान घालायला सुरुवात केली. सर्वप्रथम गुजरातमधील जखाऊ पोर्टवर या वादळाचा परिणाम जाणवला.
बिपरजॉय चक्रिवादळ गुजरातमध्ये पोहोचले असून तेथे थैमान घालायला सुरुवात केली आहे. या वादळाच्या वेगाचा अंदाज आधीच लावण्यात आलेला होता. हे वादळ समुद्र किनाऱ्यावर पोहोचताच त्याने थैमान घालायला सुरुवात केली. सर्वप्रथम गुजरातमधील जखाऊ पोर्टवर या वादळाचा परिणाम जाणवला.
यावादळामुळे गुजरातमध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. अनेक झाडी उन्मळून पडली आहेत. तसेच अनेक गावांतील वीजेच्या तारा तुटल्याने तेथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. वादळाच्या या थैमाना नंतर आता बचाव कार्यही सुरू झाले आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (16 जून) बिपरजॉयची तीव्रता कमी होईल. यानंतर हवेची तीव्रता कमी होऊन हे वादळ दक्षिण राजस्थानच्या दिशेने जाईल.
वेगवान वाऱ्याचा हाहाकार -
हे वादळ 15 जून रोजी गुजरातमधील जखाऊ पोर्टवर पोहोचले, तेव्हा याचा वेग 115 ते 125 किमी प्रति तास एढा होता. काही ठिकाणी वेग अधिक दिसून आला. या वादळामुळे झालेल्या लँडफॉलमुळे अनेक ठिकाणचे वीजेचे खंबेही पडले आहेत. यामुळे मालिया तालुक्यातील तब्बल 45 गांवांमधील वीजपुरवटा खंडित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागात जवळपास 300 हून अधिक वीजेचे खंबे पडले आहेत. मात्र यामुळे खंडित झालेला अनेक गावांचा वीज पुरवठा आधीपासूनच असलेल्या तयारीमुळे पुन्हा सुरळित करण्यात आला आहे. तसेच इतर ठिकाणीही वीज विभागाचे काम सुरू आहे.
अनेक लोक जखमी -
या वादळामुळे झालेल्या लँडफॉलमुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यात एकूण 22 लोक जखमी झाले आहेत. सुदैवाने यात जीवितहाणीचे वृत्त नाही. मात्र यात अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याचे समजते. गुजरातमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, या वादळात 23 जानवरांचा मृत्यू झाला आहे. तसेच 900 हून अधिक गावांमध्ये सध्या वीज नाही.