Biparjoy: मुसळधार पाऊस, झाडे कोसळली; गुजरातला धडकलं वादळ, मध्यरात्रीपर्यंत हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 10:57 PM2023-06-15T22:57:05+5:302023-06-15T22:57:32+5:30

IMD नुसार, वादळाच्या लँडफॉल प्रक्रिया संध्याकाळी ६.३० वाजता सुरू झाली, जी मध्यरात्रीपर्यंत सुरू राहील.

Biparjoy: Heavy rain, downed trees; Storm hit Gujarat, warns till midnight | Biparjoy: मुसळधार पाऊस, झाडे कोसळली; गुजरातला धडकलं वादळ, मध्यरात्रीपर्यंत हाहाकार

Biparjoy: मुसळधार पाऊस, झाडे कोसळली; गुजरातला धडकलं वादळ, मध्यरात्रीपर्यंत हाहाकार

googlenewsNext

अहमदाबाद - महाचक्रीवादळ बिपरजॉय जसजसे पुढे सरकत आहे तसतसा त्याचा प्रभाव तीव्र होताना दिसत आहे. बिपरजॉय चक्रीवादळानं मोठा फटका बसण्याची भीती वर्तवली जात आहे. केंद्र सरकारकडून ८ राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नौदल, हवाई दल, आर्मी, एनडीआरएफसह सर्व सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत. ७४ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ कच्छमध्ये धडकण्यास सुरुवात झाली आहे. या काळात ११५-१२५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. सध्या सौराष्ट्रात सर्वच भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मध्यरात्रीपर्यंत लँडफॉल सुरू राहील. यानंतर वादळ कमकुवत होऊन राजस्थानकडे वळेल. मात्र, त्यापूर्वीच कच्छ, जामनगर आणि द्वारकामध्ये जोरदार वाऱ्यामुळे विजेचे खांब आणि झाडे पडल्याचं विदारक चित्र समोर येत आहे. अनेक भागातील वीजही खंडित झाली आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाच्या धोक्याबाबत केंद्रापासून राज्य सरकारपर्यंत सर्वजण सतर्क आहेत. NDRF च्या १७ टीम आणि SDRF च्या १२ टीम गुजरातमध्ये तैनात आहेत. त्याचबरोबर नौदलाची ४ जहाजे सध्या स्टँडबायमध्ये ठेवण्यात आली आहेत. किनाऱ्यालगत राहणाऱ्या ७४००० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात आणि महाराष्ट्रासह ९ राज्यांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि राजस्थान (पश्चिम) ही ९ राज्ये आहेत.

IMD नुसार, वादळाच्या लँडफॉल प्रक्रिया संध्याकाळी ६.३० वाजता सुरू झाली, जी मध्यरात्रीपर्यंत सुरू राहील. त्यामुळे गुजरातमध्ये बहुतांश ठिकाणी अधूनमधून पाऊस पडत आहे. दुसरीकडे जखाऊ बंदराच्या पुढे नलियात वाऱ्याचा कमाल वेग ताशी ९५ किमी होता. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मांडवी, मुंद्रा, नलिया आणि लखापतमध्ये वीज खंडित करण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील सर्व शाळा १६ जून रोजी बंद राहतील.

Web Title: Biparjoy: Heavy rain, downed trees; Storm hit Gujarat, warns till midnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.