Bipin Rawat: बिपीन रावत यांच्यासह इतरांवर आज अंत्यसंस्कार; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं अंत्यदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 06:09 AM2021-12-10T06:09:44+5:302021-12-10T06:10:57+5:30

Bipin Rawat Helicopter Accident: हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडला अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरू

Bipin Rawat: Funeral of Bipin Rawat and others today, PM Narendra Modi paid his last respects | Bipin Rawat: बिपीन रावत यांच्यासह इतरांवर आज अंत्यसंस्कार; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं अंत्यदर्शन

Bipin Rawat: बिपीन रावत यांच्यासह इतरांवर आज अंत्यसंस्कार; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं अंत्यदर्शन

Next

नवी दिल्ली : तामिळनाडूमध्ये भारतीय हवाई दलाचे एमआय-१७ व्ही- ५ हेलिकॉप्टर बुधवारी कोसळून झालेल्या अपघातात देशाचे पहिलेवहिले संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील रावत यांच्यासह सर्व मृतांना संसदेच्या दोन्ही सभागृहांत गुरुवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडला असून, त्यातील माहिती विश्लेषणावरून दुर्घटनेचे नेमके कारण लवकरच स्पष्ट होईल.

अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले. एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील विशेष समिती अपघाताची चौकशी करणार आहे. त्यात तीनही सैन्यदलांचे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. या तज्ज्ञांनी गुरुवारी अपघातस्थळी जाऊन बारकाईने पाहणी केली. हेलिकॉप्टरच्या ब्लॅक बॉक्ससह दोन बॉक्स ताब्यात घेतले आहेत. अपघात झाला त्या ठिकाणापासून ३०० मीटरच्या परिघात शोध घेतल्यानंतर ब्लॅक बाॅक्स सापडला. 

पार्थिव दिल्लीत : जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचे पार्थिव गुरुवारी सायंकाळी राजधानी दिल्लीतील पालम विमानतळावर आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावत यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. 

जखमीची प्रकृती स्थिर

हेलिकॉप्टर अपघातातून वाचलेले ग्रुप कॅप्टन वरुणसिंह यांना पुढील उपचारांसाठी वेलिंग्टन येथून बंगळुरूच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर आतापर्यंत तीन शस्त्रक्रिया झाल्या असून प्रकृती स्थिर असल्याचे लष्करी सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Bipin Rawat: Funeral of Bipin Rawat and others today, PM Narendra Modi paid his last respects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.