विप्लव देव यांनी घेतली त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 01:46 PM2018-03-09T13:46:34+5:302018-03-09T13:59:52+5:30
25 वर्षे सलग त्रिपुरावर राज्य करणाऱ्या डाव्यांची सत्ता उलथवण्यात यश आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे विप्लव देव त्रिपुराचे मुख्यमंत्री झाले आहेत. देव यांनी आज आगरतळा येथे झालेल्या कार्यक्रमात पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.
आगरतळा- 25 वर्षे सलग त्रिपुरावर राज्य करणाऱ्या डाव्यांची सत्ता उलथवण्यात यश आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे विप्लव देव त्रिपुराचे मुख्यमंत्री झाले आहेत. देव यांनी आज आगरतळा येथे झालेल्या कार्यक्रमात पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी त्यांना शपथ दिली. तर जिष्णू देववर्मन यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
All set for a pro-people & pro-development nationalistic Government to take charge in #Tripura under the young and dynamic Shri @BjpBiplab ji in the presence of Hon'ble PM Shri @narendramodi ji.#SabkaSaathSabkaVikash#NewEngineOfGrowth
— Sarbananda Sonowal (@sarbanandsonwal) March 9, 2018
६ मार्च रोजी राज्यपाल रॉय यांच्याकडे देव यांनी आयटीपीएफ या मित्रपक्षासह ४३ सदस्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला होता. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते. त्रिपुरामध्ये माणिक सरकार सलग २० वर्षे मुख्यमंत्री होते. त्रिपुरा विधानसभेतील ६० जागांपैकी ५९ जागांवर झालेल्या निवडणुकीत माकपाला केवळ १६ जागा मिळाल्याने त्यांची सत्ता संपुष्टात आली आहे तर भाजपाला ३९ जागांवर विजय मिळवता आला. ४८ वर्षांचे विप्लव देव गेली अनेक वर्षे रा. स्व. संघाशी संबंधीत आहेत.
Invited Ex CM Sh. Manik Sarkar ji & CPM Tripura Secretary Bijan Dhar ji at CPM State Office in presence of @rammadhavbjp ji to swearing ceremony tomorrow. pic.twitter.com/we4CRXx4Ho
— Biplab Kumar Deb (@BjpBiplab) March 8, 2018