चिडी मारण्याची बंदुकी दिली, वाघ मारण्याची अपेक्षा कशी करता? गुलाबराव पाटील यांची फटकेबाजी : गिरीश महाजनांच्या आड येणार्यांचा सत्यानाश होईल
By admin | Published: October 16, 2016 09:27 PM2016-10-16T21:27:05+5:302016-10-16T21:27:05+5:30
जळगाव : सहकार खात्याचा मंत्री असलो तरी माझ्याकडे फार काही देण्यासारखे नाही. सकाळी उठल्याबरोबर ठेवीदार दारात उभे राहतात. कर्जाचे पुनर्गठनासाठीच्या निधीबाबत विचारणा होते. माझ्या हातात चिडी मारण्याची बंदुक दिली मात्र जनता माझ्याकडून वाघ मारण्याची अपेक्षा करीत असल्याचे सांगत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी चौफेर फटकेबाजी केली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या आड येणार्यांचा सत्यानाश व्हावा असा नारा देखील त्यांनी आपल्या भाषणात दिला.
Next
ज गाव : सहकार खात्याचा मंत्री असलो तरी माझ्याकडे फार काही देण्यासारखे नाही. सकाळी उठल्याबरोबर ठेवीदार दारात उभे राहतात. कर्जाचे पुनर्गठनासाठीच्या निधीबाबत विचारणा होते. माझ्या हातात चिडी मारण्याची बंदुक दिली मात्र जनता माझ्याकडून वाघ मारण्याची अपेक्षा करीत असल्याचे सांगत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी चौफेर फटकेबाजी केली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या आड येणार्यांचा सत्यानाश व्हावा असा नारा देखील त्यांनी आपल्या भाषणात दिला.जामनेर येथील सभेच्या ठिकाणी गुलाबराव पाटील यांचे आगमन झाल्याबरोबर प्रेक्षकांमधून गुलाबरावांनी भाषण करावे अशी मागणी येऊ लागली. भाषणासाठी गुलाबराव माईकजवळ आल्यानंतर प्रेक्षकांनी एकच घोषणाबाजी सुरु केली.गिरीश महाजन यांनी जिल्ाचा विकास करावाटपरीवाला आमदार म्हणून गिरीश महाजन व आपली सारखीच ओळख. कार्यकर्त्यांना प्रेम देणारा माणूस म्हणजे गिरीश भाऊ आहे. त्यांनी जामनेर तालुक्याचा विकास करून इतिहास घडविला आहे. मात्र त्यांनी आता केवळ जामनेरचा विचार न करता संपूर्ण जिल्ह्याचा विकास करावा असे आवाहन केले.१०० कोटी दिल्यास आमचे नंदनवन होईलजलसंपदा मंत्र्यांनी वाघूर धरणाला पैसे दिले. निम्न तापी व शेळगाव बॅरेजच्या कामाला देखील गती दिली आहे. जामनेरसह जळगाव ग्रामीणला संजीवनी देणार्या भागपूर प्रकल्पासाठी १०० कोटीच्या निधीची तरतूद केल्यास आमच्या भागात देखील नंदनवन येईल अशी अपेक्षा गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.तुमच्या लग्नात माझा साखरपुडाजामनेरमध्ये विकासकामांचा धडाका सुरु असल्याने तुमचे लग्न सुरु आहे. जादा निधी मिळवित तुमच्या लग्नात आमचा साखरपुडा करून घ्यावा असा विचार सुरू आहे. मतदारसंघाला निधी मिळावा यासाठी परमार्थाबरोबर थोडा स्वार्थ साधत असल्याचे गुलाबरावम्हणाले.सकाळी उठलो की ठेवीदारांची भेट होतेसकाळी झोपेतून उठलो की पहिली भेट ही ठेवीदारांची होते. जिल्ह्यातील ठेवीदारांची ४१७ कोटी रुपयांची देणी आहेत. ठेवीदार व शेतकर्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी मदत मिळावी अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. असे झाल्यास गिरीशभाऊच्या विकासाच्या इंजिनला गुलाबरावचा डब्बा जोडला जाईल असे सांगताच सभास्थळी हास्यकल्लोळउडाला....त्यांचा सत्यानाश होवोगिरीशभाऊ हे पैशांनी श्रीमंत नाहीत मात्र माणसे जोडणारा आणि मनाने मोठा असलेला माणूस आहे. त्यांच्या आड जो कुणी येईल त्याचा सत्यानाश होईल असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी महाजन विरोधकांना लगावला.