कोळसाप्रकरणी बिर्ला यांची चौकशी
By admin | Published: January 22, 2015 03:17 AM2015-01-22T03:17:26+5:302015-01-22T03:17:26+5:30
खोळसा खाणवाटपातील कथित गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) बुधवारी आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांची चौकशी केली.
नवी दिल्ली : खोळसा खाणवाटपातील कथित गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) बुधवारी आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांची चौकशी केली. बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला २००५ मध्ये झालेल्या तलाबिला-२ खाणवाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.
या खाणवाटप व्यवहाराच्या चौकशीची फाइल सीबीआयने बंद केली होती. विशेष न्यायालयाने या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर एफआयआरमध्ये आरोपी म्हणून नाव असलेल्या कुमारमंगलम बिर्ला यांची चौकशी केली. बिर्ला यांना तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल विचारणा करण्यात आल्याचे समजते. तत्कालीन कोळसा सचिव पी. सी. पारख यांचीही चौकशी झाली.