जन्माचा दाखला आता आधारपेक्षाही महत्त्वाचा, ‘एक देश एक दाखला’ कायदा हाेणार लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 08:36 AM2023-09-15T08:36:57+5:302023-09-15T08:37:20+5:30
Birth certificate : वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, विवाह नाेंदणी, पासपाेर्ट, शाळेतील प्रवेश इत्यादींसाठी तुम्ही अर्ज करणार असाल तर ही बातमी फार महत्त्वाची आहे. या कामांसाठी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्राचे महत्त्व वाढणार आहे.
नवी दिल्ली - वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, विवाह नाेंदणी, पासपाेर्ट, शाळेतील प्रवेश इत्यादींसाठी तुम्ही अर्ज करणार असाल तर ही बातमी फार महत्त्वाची आहे. या कामांसाठी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्राचे महत्त्व वाढणार आहे. १ ऑक्टाेबरपासून अनेक ठिकाणी याचा वापर अत्यावश्यक कागदपत्र म्हणून हाेणार आहे.
जन्म आणि मृत्यू नाेंदणी संशाेधन विधेयकाला राष्ट्रपतींनीदेखील मंजुरी दिली आहे. त्याची अंमलबजावणी १ ऑक्टाेबरपासून हाेणार आहे. नव्या कायद्यामुळे नागरिकांच्या नाेंदणीकृत जन्मतारखेची राष्ट्रीय आणि राज्यपातळीवर माहिती गाेळा करण्यासाठी मदत हाेणार आहे. विविध प्रकारच्या सार्वजनिक सेवा चांगल्या पद्धतीने पुरविता येतील. आधार कार्डप्रमाणेच जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्राचा वापर हाेईल.
डिजिटल प्रमाणपत्रे
- नवा कायदा लागू झाल्यानंतर जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपातही मिळतील. सध्या त्यांची छापील प्रत मिळते. डिजिटल प्रक्रियेमुळे काम लवकर हाेईल.
या कामांसाठी वापर
- शाळेत प्रवेश, मतदार नाेंदणी, वाहनचालक परवाना, विवाह नाेंदणी, पासपाेर्ट बनविणे, सरकारी नाेकरी, आधार नाेंदणी.