आता ट्रेनमध्ये साजरा करा वाढदिवस, रेल्वेकडून मिळणार गिफ्ट; IRCTC नं आणली खास ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 07:40 PM2021-08-30T19:40:20+5:302021-08-30T19:40:36+5:30

Indian Railways: IRCTC नं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या ऑफरची माहिती दिली आहे.

Birthdays can be celebrated in train, special offer by IRCTC | आता ट्रेनमध्ये साजरा करा वाढदिवस, रेल्वेकडून मिळणार गिफ्ट; IRCTC नं आणली खास ऑफर

आता ट्रेनमध्ये साजरा करा वाढदिवस, रेल्वेकडून मिळणार गिफ्ट; IRCTC नं आणली खास ऑफर

Next

नवी दिल्ली: जर तुम्ही रेल्वेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तेजस एक्सप्रेसनं रेल्वे प्रवाशांसाठी खास ऑफर आणली आहे. या नवीन ऑफर अंतर्गत तुम्ही धावत्या ट्रेनमध्ये आपला वाढदिवस साजरा करू शकता. तेजसचे प्रवासी एका लकी ड्रॉद्वारे बक्षिसही जिंकू शकतात. यासाठी तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही, तुम्ही तिकीट खरेदी करताच बक्षिसं जिंकण्याच्या लकी ड्रॉ मध्ये तुमचं नाव येतं. IRCTC नं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर तेजस एक्सप्रेसच्या या ऑफरची माहिती दिली आहे.

तेजस एक्सप्रेसनं प्रवाशांसाठी लकी ड्रॉ योजना सुरू केली आहे. या अंतर्गत 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत तुम्हाला एक आकर्षक गिफ्ट मिळेल. तेजस एक्सप्रेस ही देशातील पहिली खासगी ट्रेन आहे, जी IRCTC द्वारे चालवली जाते. ही ट्रेन आपल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेळोवेळी विविध ऑफर आणत राहते.

IRCTC ने अशीही व्यवस्था केली आहे की, जर तिकीट इतर कोणी बुक केले असेल आणि IRCTC ला तुमच्या वाढदिवसाची माहिती नसेल, तर प्रवासी स्टेशनवर तेजस एक्सप्रेस कर्मचाऱ्यांना आपल्या वाढदिवसाची माहिती देऊ शकतात. यानंतर तेजसच्या कर्मचाऱ्यांकडून तुमच्या वाढदिवसाच्या केकची व्यवस्था केली जाते.

13 प्रवाशांना दररोज मिळतं गिफ्ट

लकी ड्रॉ योजनेमध्ये बक्षीस विजेत्या प्रवाशांची निवड करण्याची एक विशेष पद्धत आहे. दररोज 13 प्रवाशांना तेजस एक्सप्रेसकडून भेट दिली जात आहे. सुरुवातीला काही प्रवाशांना गिफ्ट मिळाल्यानंतर त्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला होता. या योजनेची सुरुवात 27 ऑगस्टपासून झाली आहे. दरम्यान, दररोज कंप्यूटर चेयर कारमध्ये प्रवास करणाऱ्या 10 प्रवाशांना आणि एग्जीक्यूटिव क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या 3 प्रवाशांना दररोज भेटवस्तू वितरित केल्या जात आहेत. 
 

Web Title: Birthdays can be celebrated in train, special offer by IRCTC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.