बिर्याणीने नपुंसकत्व; बंगालमध्ये दुकाने बंद; सोशल मीडियाच्या माध्यमांतून संताप व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 09:22 AM2022-10-25T09:22:40+5:302022-10-25T09:23:03+5:30
ही बाब उजेडात आल्यानंतर बिर्याणीप्रेमींनी सोशल मीडिया व अन्य माध्यमांतून संताप व्यक्त केला आहे.
कूचबिहार : बिर्याणी खाल्ल्याने पुरुष नपुंसक होतात, या समजुतीतून तृणमूल काँग्रेसचे नेते रवींद्रनाथ घोष यांनी एक आंदोलन हाती घेतले. त्याद्वारे पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे बिर्याणी विक्रेत्यांची दुकाने बंद करण्यात आली आहेत. ही बाब उजेडात आल्यानंतर बिर्याणीप्रेमींनी सोशल मीडिया व अन्य माध्यमांतून संताप व्यक्त केला आहे.
यासंदर्भात रवींद्रनाथ घोष यांनी सांगितले की, कूचबिहारमधील विक्रेते बिर्याणी बनविताना वापरत असलेल्या मसाल्यांविषयी स्थानिक नागरिकांच्या मनात शंका निर्माण आहे. अशा बिर्याणीमुळे पुरुषांना नपुंसकत्व येते, अशी लोकांची समजूत झाली आहे. या विक्रेत्यांची दुकाने अनधिकृत असल्याने कारवाई केली आहे.
ज्यांची दुकाने बंद झाली त्या बिर्याणी विक्रेत्यांनी मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. तृणमूल काँग्रेसचे नेते रवींद्रनाथ घोष यांनी बिर्याणीविरोधात हाती घेतलेल्या आंदोलनाबद्दल विक्रेत्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केलेली नाही.