बिटकॉइनद्वारे रिअल इस्टेटमध्ये ब्लॅक मनी? सरकारी यंत्रणा झाल्या सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 01:57 AM2017-11-27T01:57:09+5:302017-11-27T01:57:28+5:30
रिअल इस्टेट व्यवसायाला बिट कॉईनच्या व्हर्चुअल करन्सीने नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांकडून हाती आली आहे. अनिवासी भारतीयांची यात मदत घेतली जात आहे.
- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : रिअल इस्टेट व्यवसायाला बिट कॉईनच्या व्हर्चुअल करन्सीने नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांकडून हाती आली आहे. अनिवासी भारतीयांची यात मदत घेतली जात आहे.
नोटाबंदीनंतर थंडावलेल्या व्यवसायाला बिटकॉईनच्या माध्यमातून पुन्हा बहर आण्याचे प्रयत्न सुरू झाले तर या व्यवसायावरील मंदीचे सावट बºयापैकी दूर होईल, असा विचार करून या क्षेत्रात मोठया व्यावसायिकांनी काही प्रयत्न सुरू केल्याचा सुगावा लागताच, सक्त वसुली संचलनालय (ईडी)ने चौकशी सुरू केली. विशेष म्हणजे बिटकॉईनचा वापराचे केंद्र गुजरातमधे अहमदाबाद येथे असल्याचे समजताच ईडीने दोन ठिकाणी धाडी घातल्याची माहितीही हाती आली आहे.
बिटकॉईन ब्लॉकचेन तंत्रज्ञान समजावून घेण्यासाठी अर्थ मंत्रालयाने आयटी कंपन्यांबरोबर बैठक घेतली. त्यानंतर सरकारने बिटकॉईनबाबत लवकरच एक फ्रेमवर्क तयार करण्याचा विचार सुरू केला.
काय असतात बिटकॉइन?
बिटकॉईन एक व्हर्चुअल करन्सी. कागदोपत्री कोणतेही व्यवहार नसतात. व्हर्चुअल करन्सी खरेदी करण्यासाठी याचा एक खास अॅप डाऊनलोड करावा लागतो. त्याद्वारे आपल्या खात्यातले पैसे वर्ग केल्यास बिटकॉईन खरेदी अथवा विक्रीही करता येते.