बिट्टू बजरंगीला पोलिसांनी केली अटक; नूह येथे हिंसाचार भडकावल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 07:33 PM2023-08-15T19:33:46+5:302023-08-15T19:38:31+5:30

बिट्टू बजरंगीला सीआयए तावडूने नूह हिंसाचार प्रकरणी अटक केली आहे.

Bittu Bajrangi arrested by police; Accused of inciting violence at Noah | बिट्टू बजरंगीला पोलिसांनी केली अटक; नूह येथे हिंसाचार भडकावल्याचा आरोप

बिट्टू बजरंगीला पोलिसांनी केली अटक; नूह येथे हिंसाचार भडकावल्याचा आरोप

googlenewsNext

नवी दिल्ली: नूह हिंसाचाराचा आरोपी बिट्टू बजरंगीला पोलिसांनी त्याच्या फरीदाबाद येथील घरातून अटक केली आहे. हिंसाचार प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी बिट्टू बजरंगीला अटक केली आहे. हरियाणातील नूह येथून हिंसाचार सुरू झाला, ज्याने गुरुग्राम आणि आसपासच्या जिल्ह्यांनाही वेढले. त्या हिंसाचाराचा मुख्य आरोपी बिट्टू बजरंगी होता. बृजमंडल शोभायात्रेपूर्वी बिट्टू बजरंगीने सोशल मीडियावर अनेक प्रक्षोभक पोस्ट केल्या होत्या. 

बिट्टू बजरंगीला सीआयए तावडूने नूह हिंसाचार प्रकरणी अटक केली आहे. बिट्टू बजरंगीविरुद्ध नूह येथील सदर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एएसपी उषा कुंडू यांच्या तक्रारीवरून बिट्टू बजरंगीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नूह हिंसाचाराच्या प्रकरणात बिट्टू बजरंगीवर १४८,१४९,३३२,३५३,१८६,३९५,३९७,५०६,२५,५४,५९ ही कलमे लावण्यात आली आहेत. त्याच्याविरुद्ध नूह सदर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१३ दाखल करण्यात आला होता.

हरियाणातील नूह येथील हिंदू संघटनांनी दरवर्षीप्रमाणे ३१ जुलै रोजी बृजमंडल यात्रा काढण्याची घोषणा केली होती. त्याची परवानगीही प्रशासनाकडून घेण्यात आली होती. मात्र ब्रिजमंडल यात्रेत दगडफेक करण्यात आली. काही वेळातच त्याचे दोन समुदायांमधील हिंसाचारात रूपांतर झाले. वातावरण इतके तापले की शेकडो गाड्या पेटवण्यात आल्या. सायबर पोलिस स्टेशनवरही हल्ला झाला. गोळीबारही झाला. पोलिसांवरही हल्ले झाले. नुहानंतर सोहना येथेही दगडफेक आणि गोळीबार झाला. वाहने जाळण्यात आली. यानंतर हिंसाचाराची आग नुहपासून फरीदाबाद-गुरुग्रामपर्यंत पसरली.

बिट्टू बजरंगी शस्त्रांबाबत काय म्हणाला?

बिट्टू बजरंगीला विचारले असता, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रवासी शस्त्रे घेऊन जाताना दिसत आहेत. यावर बजरंगी म्हणाले, 'काही लोकांकडे शस्त्रे होती, मात्र ते सर्व परवानाधारक होते. आणि आपण ज्या तलवारी ठेवतो त्या पूजेसाठी, लग्नसमारंभासाठी, विधींसाठी वापरल्या जातात; त्यांचा वापर हत्येसाठी होत नाही.

प्रक्षोभक व्हिडिओ पोस्ट केला होता

बिट्टू बजरंगीने एक व्हिडिओ क्लिप शेअर केली होती ज्यामध्ये तो भगव्या पोशाखात दिसत होता. त्यात ‘गोली पे गोली चलेंगे, बाप तो बाप रहेगा’ हे गाणेही वाजत होते.

Web Title: Bittu Bajrangi arrested by police; Accused of inciting violence at Noah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.