Gurugram Building Collapse: विचित्र दुर्घटना! सातव्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यापर्यंत कोसळला; दोन ठार, चार कुटुंबे अडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 10:14 PM2022-02-10T22:14:37+5:302022-02-10T22:23:29+5:30

Gurugram Building Collapse: मलब्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. सहाव्या मजल्यावर या इमारतीत काम सुरु होते.

Bizarre accident! seventh-floor slab collapsed to the first floor; Two killed, four families stranded in Gurugram Building Collapse | Gurugram Building Collapse: विचित्र दुर्घटना! सातव्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यापर्यंत कोसळला; दोन ठार, चार कुटुंबे अडकली

Gurugram Building Collapse: विचित्र दुर्घटना! सातव्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यापर्यंत कोसळला; दोन ठार, चार कुटुंबे अडकली

Next

गुरुग्राममध्ये एक विचित्र घटना घडली आहे. २२ मजली इमारतीतील सातवा मजला इमारतीतच कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला असून चार कुटुंबे अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अनेक लोक जखमी असल्याचे सांगितले जात आहे. बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. 

मलब्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. सहाव्या मजल्यावर या इमारतीत काम सुरु होते. गुरुग्रामच्या सेक्टर १०९ मध्ये Chintels Paradiso ही इमारत आहे. या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर इंटेरिअरचे काम सुरु होते. तेवढ्यात सातव्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला, यामुळे सहाव्या ते पहिल्या मजल्यावरील स्लॅब खाली आला. 


उल्हासनगरमध्ये देखील गेल्या वर्षी अशीच दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. इमारतीच्या बांधकामासाठी कमी प्रतीचे साहित्य वापरण्याची आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही फ्लॅटमधील कुटुंबे बाहेर गेली होती, यामुळे ती बचावल्याचे सांगितले जात आहे. तर चार कुटुंबे मलब्याखाली अडकल्याचे सांगितले जात आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 


 

Web Title: Bizarre accident! seventh-floor slab collapsed to the first floor; Two killed, four families stranded in Gurugram Building Collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.