निर्भिड पत्रकारिता करण्यासाठी त्यांनी राजकारणातून घेतली निवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 04:35 PM2019-03-06T16:35:44+5:302019-03-06T16:42:18+5:30

ओदिशामधील एका खासदारांनी चक्क पत्रकारितेमध्ये पुन्हा प्रवेश करण्यासाठी राजकारणाला रामराम ठोकल्याचे दुर्मीळ चित्र समोर आले आहे.

BJD leader Tathagata Satpathy quits politics for journalism | निर्भिड पत्रकारिता करण्यासाठी त्यांनी राजकारणातून घेतली निवृत्ती

निर्भिड पत्रकारिता करण्यासाठी त्यांनी राजकारणातून घेतली निवृत्ती

googlenewsNext
ठळक मुद्देतथागत सत्पथी असे पत्रकारितेसाठी राजकारण सोडणाऱ्या खासदारांचे नाव बिजू जनता दल पक्षाचे नेते असलेले सत्पथी हे चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेततथागत सत्पती यांच्या कुटुंबाला राजकारणाचा प्रदीर्घ वासरा असून, त्यांच्या मातोश्री नंदिनी सत्पथी या प्रख्यात लेखिका आणि ओदिशाच्या माजी मुख्यमंत्री होत्या

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांमध्ये राजकारण हे जनसेवेपेक्षा सत्ता, प्रसिद्धी आणि संपत्ती मिळण्याचे साधन बनले आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात कार्यरत असलेली मंडळी राजकारणात प्रवेश करण्याची संधी शोधत असतात. मात्र ओदिशामधील एका खासदारांनी चक्क पत्रकारितेमध्ये पुन्हा प्रवेश करण्यासाठी राजकारणाला रामराम ठोकल्याचे दुर्मीळ चित्र समोर आले आहे. तथागत सत्पथी असे पत्रकारितेसाठी राजकारण सोडणाऱ्या खासदारांचे नाव असून, बिजू जनता दल पक्षाचे नेते असलेले सत्पथी हे चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.  

राजकारणात स्थिरस्थावर झाल्यानंतर अनेकजण अखेरच्या श्वासापर्यंत पदाला चिकटून राहतात. मात्र प्रदीर्घ राजकीय वारसा लाभलेला असूनही सत्पथी यांनी राजकारण सोडून आपला मूळ पेशा असलेल्या पत्रकारितेकडे वळण्याचा निर्णय घेतला. तथागत सत्पती यांच्या कुटुंबाला राजकारणाचा प्रदीर्घ वासरा असून, त्यांच्या मातोश्री नंदिनी सत्पथी या प्रख्यात लेखिका आणि ओदिशाच्या माजी मुख्यमंत्री होत्या. नंदिनी सत्पथी यांनी 14 जून 1972 ते 16 डिसेंबर 1976 या काळात ओदिशाचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते. 




 तथागत सत्पथी हे ओदिशामधील ढेंकनाल लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.  दरम्यान, पत्रकारितेमध्ये पुन्हा येण्यासाठी त्यांनी वयाच्या 62 व्या वर्षी राजकारणातून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयाबाबत ते म्हणाले की, ''सध्या पत्रकारितेला निडर आणि निर्भिड आवाजांची गरज आहे. त्यामुळे पत्रकारितेवर पुन्हा एकदा लक्ष्य केंद्रित करण्यासाठी मी राजकारणापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या दीर्घ राजकीय प्रवासादरम्यान केलेल्या सहकार्याबद्दल मी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा आभारी आहे. मात्र आता जनसेवेसाठी राजकारण हे माध्यम नाही याची जाणीव मला झाली आहे.'' 




 दरम्यान, आपल्याला मतदान करणाऱ्या मतदारांचेही सत्पथी यांनी आभार मानले आहेत. ज्या मतदारांनी आम्हाला नेहमीच पाठिंबा आणि प्रेम दिले त्यांचे मी आभार मानतो. देशामध्ये सामाजिक नेतृत्वाचा अभाव आहे तसेच युवा नेतृत्वाला पुढे आणण्याचीही हीच योग्य वेळ आहे.'' असेही सत्पती म्हणाले. 



 

Web Title: BJD leader Tathagata Satpathy quits politics for journalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.