भाजपा, मित्रपक्षांची १८ राज्यांत सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 04:11 AM2017-08-07T04:11:12+5:302017-08-07T04:11:26+5:30

 BJP, 18 states of Alliance with power | भाजपा, मित्रपक्षांची १८ राज्यांत सत्ता

भाजपा, मित्रपक्षांची १८ राज्यांत सत्ता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लालूप्रसाद यादव यांचे राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्यासोबत केलेली महाआघाडी मोडूनही नितिश कुमार यांनी बिहारची सत्ता कायम राखणे हा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरला. कारण बिहारच्या रूपाने भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांकडे केंद्रातील सत्तेखेरीज देशातील १८ राज्यांची सत्ता आली.
सन १९९३ नंतर तब्बल २४ वर्षांनी राजकीय इतिहासाची उलट्या पद्धतीने पुनरावृत्ती झाली. १९९३ मध्ये केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेस आणि मित्रपक्षांकडे अशाच प्रकारे देशातील १८ राज्यांची सत्ता आली होती. अर्थात यात सत्ता असलेल्या राज्यांचा १८ हा आकडा सारखा असला तरी गेल्या दोन दशकात देशात प्रामुख्याने आघाडी आणि युतीची सरकारे आल्याने याची राजकीय समिकरणे मात्र बदलली आहेत. आज केंद्रातील ‘राओला’आघाडीसह विविध राज्यांमधील सत्तांमध्ये मिळून भजपासोबत एकूण ४३ लहान-मोठे पक्ष आहेत. भाजपाची स्वत:ची अथवा मित्रपक्षांच्या आघाडीची उत्तराखंड, हरियाणा, यूपी, राजस्थान, मध्य ्परदेश, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगढ, आसाम, जम्मू-काश्मीर, सिक्किम, बिहार, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, गोवा व नागालँड या राज्यांमध्ये सरकारे आहेत.

लोकसभेतील ६६ टक्के खासदार निवडून देणारी राज्ये

१काँग्रेसकडे सत्ता असलेली १९९३ मधील १८ राज्ये आणि भाजपा व मित्रपक्षांकडे सत्ता असलेली आताची १८ राज्ये यात दोन बाबतीत मोठा फरक आहे. आता भाजपा आणि मित्रपक्षांकडे असलेली राज्ये मोठी व हिंदी पट्ट्यातील आहेत. लोकसभेतील ६६ टक्के सदस्य निवडून देणारी ही राज्ये आहेत. काँग्रेसकडे जी १८ राज्ये होती ती तुलनेने लहान होती व लोकसभेच्या दृष्टीने विचार केला तर तेथून फक्त ४८ सदस्य निवडून जायचे.

२आणखी एक फरक असा की, काँग्रेसकडे १९९३ मध्ये असलेल्या १८ राज्यांमध्ये भारताच्या सन १९९१च्या जनगणनेनुसार ४५ टक्के लोकसंख्या राहात होती. आता सन २०११ च्या शिरगणतीनुसार ६८ टक्के लोक भाजपा व मित्रपक्षांची सत्ता असलेल्या १८ राज्यांमध्ये आहे.

Web Title:  BJP, 18 states of Alliance with power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.