भाजपाचा केजरीवालांवर जाहिरातीतून पुन्हा हल्ला

By Admin | Published: February 2, 2015 09:19 AM2015-02-02T09:19:21+5:302015-02-02T10:12:13+5:30

भाजपाने आणखी एक जाहिरातीच्या माध्यमातून केजरीवालांवर निशाणा साधत प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे आमंत्रण न मिळाल्याने नाराज असलेल्या केजरीवाल यांच्यावर जाहिरातीतून टीका करण्यात आली आहे.

BJP again attacks Kejriwal on advertisement | भाजपाचा केजरीवालांवर जाहिरातीतून पुन्हा हल्ला

भाजपाचा केजरीवालांवर जाहिरातीतून पुन्हा हल्ला

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर जाहिरातीतून टीका करताना अण्णा हजारेंच्या फोटाला हार घातल्याने भाजपावर टीका होत असतानाही त्यांनी केजरीवालांवर हल्ला सुरूच ठेवला आहे. भाजपाने आणखी एक जाहिरातीच्या माध्यमातून केजरीवालांवर निशाणा साधला असून २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे आमंत्रण न मिळाल्यामुळे झालेला वाद आणि परेड पास यावर जाहिरातीतून टीका करण्यात आली आहे. तसेच केजरीवाल  'उपद्रवी गोत्रा'चे आहेत असेही म्हटले आहे. 
या जाहिरातीत २६ जानेवारीचा सोहळा कार्टूनच्या माध्यनातून दाखवण्यात आला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान मंचावर असल्याचे चितारण्यात आले आहे. तर परेडदरम्यान केजरीवाल झाडू फिरवत राजपथावर उपस्थित असलेले दाखवण्यात आले आहे.  आणि त्याशेजारी  'मेरी ना सुनी तो तो २६ जनवरी का प्रोग्राम भी बिगाड जाऊंगा... और एक साल बाद व्हीआयपी पास की गुहार भी लगाउंगा' असेही लिहीण्यात आले आहे. 
तसेच जाहिरातीच्या खाली केजरीवाल यांना 'आंदोलनकारी' असे संबोधित करत ' देशातील करोडो लोक प्रजासत्ताक दिन साजरा करतात, त्याबद्दल अभिमान बाळगतात आणि तुमचे उपद्रवी गोत्र त्यातही अडथळा आणण्याच्या तयारीत होता. आता यांनी ( केजरीवाल) पलटी मारली असून ते प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी व्हीआयपी पासची मागणी करत आहेत.'
'तुम्ही आम आदमी आहात की व्हीआयपी? हे एकदाच ठरवा. की आम आदमीच्या वेशातील खास आदमी? आपण दिल्लीला अशा धोकेबाज लोकांच्या हातात सोपवू शकतो का? ज्याने ४९ दिवस दिल्लीच्या नाकात दम केला ती व्यक्ती ५ वर्षांत दिल्लीची काय गत करेल?' असा सवालही जाहिरातीच्या शेवटी विचारण्यात आला आहे.
आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांनी या जाहिरातीबाबत नाराजी नोंदवली आहे. 'भाजपाने आज जाहिरातीत हद्द केली आहे, असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे. ' भाजपाने जाहिरातीत माझ्या गोत्राला उपद्रवी गोत्र म्हणत संपूर्ण अगरवाल समाजालाच उपद्रवी म्हटले आहे. त्यांची लढाई माझ्याविरोधात असू शकते, पण ते संपूर्ण अगरवास समाजावर टीका कशी करू शकतात? या जाहिरातीतून भाजपा आता जातीपातीच्या राजकारणावर उतरली असून त्यांनी संपूर्ण समाजाची माफी मागितली पाहिजे. याप्रकरणी आम्ही निवडमूक आयोगाकडे तक्रार करू, असेही त्यांनी म्हटले आहे.  
दिल्ली विधानसभा निवडणुकीला अवघे काहीच दिवस उरलेले असताना आप आणि भाजपामध्ये चांगलेच युद्ध रंगले आहे. भाजपाने आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना टार्गेट करण्यासाठी जाहिरातींचे माध्यम निवडले आहे. यापूर्वी आलेल्या एका जाहिरातीत आम आदमी पक्ष व काँग्रेसवर टीका करण्यात आली होती व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या फोटोला चक्क हार घातल्याचे दाखवण्यात आले होते. या जाहिरातीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेससोबत लग्न केले व ते त्यांच्या मुलांच्या डोक्यावर हात ठेऊन शपथ घेतानाचे दाखवण्यात आले. या चित्रात भिंतीवर अण्णा हजारेंचा फोटो असून या फोटोला हार घालण्यात आला होता. त्यावरून भाजपावर चहुबाजूने टीका होत असतानाही त्यांनी जाहिरातींचे सत्र सुरूच ठेवले आहे. 
 

Web Title: BJP again attacks Kejriwal on advertisement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.