नोटबंदीला विरोध करणाऱ्यांविरोधात भाजपा आक्रमक
By admin | Published: November 14, 2016 04:01 PM2016-11-14T16:01:12+5:302016-11-14T16:01:12+5:30
नोटबंदीला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांविरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयामुळे लोकांना होत असलेल्या त्रासामुळे राजकीय पक्षांना मोदींवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. मात्र नोटबंदीला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांविरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचा वापर होत असल्याने ते या निर्णयाला विरोध करत असल्याचा आरोप भाजपा नेते सिद्धार्थनाथ सिंग यांनी केला.
दिल्लीत प्रसारामाध्यमांशी संवाद साधताना सिंग यांनी नोटबंदीला विरोध करत असलेल्या ममता बॅनर्जींसह इतर नेत्यांचा समाचार घेतला. "शारदा, नारदासारख्या चिटफंट घोटाळ्यात आरोप झालेल्या ममता बॅनर्जी यांच्या पायाखालील वाळू या निर्णयामुळे सरकली आहे. ममता या निर्णयाला विरोध करण्यासाठी डाव्या पक्षांना सोबत घेत आहेत. खरंतर ममतांचा तृणमूल काँग्रेस आणि डावे पक्ष हे एकाचा नाण्याच्या दोन बाजू आहेत," असे सिद्धार्थनाथ सिंग म्हणाले.
"नोटबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका काळ्या पैशाचा वापर करणाऱ्या राजकीय पक्षांना बसला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून होत आहे." असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही नोटबंदीवर टीका करणाऱ्या राजकीय पक्षांचा समाचार घेतला.
Queen of Saradha and Narada is trying to unite oppn against Govt, they are shaken by this step of Modi ji: SN Singh,BJP #DeMonetisationpic.twitter.com/oRott9fK4g
— ANI (@ANI_news) 14 November 2016
Trinamool and Left parties are mirror images of each other: Sidharthnath Singh,BJP #DeMonetisationpic.twitter.com/ZOmKmZWKHA
— ANI (@ANI_news) 14 November 2016