Video - ...अन् थेट हेल्मेट घालून सभेत भाषण द्यायला पोहोचला भाजपा आमदार; 'या' गोष्टीची होती भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 12:29 PM2022-12-21T12:29:30+5:302022-12-21T12:40:35+5:30
BJP Ajay Chandrakar : अजय चंद्राकर यांचा अनोखा अंदाज आता पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. हेल्मेट परिधान करून त्यांनी सभेत लोकांना संबोधित केलं आहे.
छत्तीसगडचे भाजपा आमदार आणि माजी मंत्री अजय चंद्राकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कधी ते आपल्या विधानांमुळे चर्चेत राहतात तर कधी असं काम करतात की ते चर्चेचा विषय ठरतं. अजय चंद्राकर यांचा अनोखा अंदाज आता पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. हेल्मेट परिधान करून त्यांनी सभेत लोकांना संबोधित केलं आहे. कोणीतरी आपल्यावर दगड फेकतील अशी भीती त्यांना वाटत होती.
'काँग्रेस हटाओ छत्तीसगड बचाओ'चा नारा देत भारतीय जनता पक्ष (भाजप) दुर्ग जिल्ह्यात रॅली आणि जाहीर सभा घेत आहे. ज्यामध्ये भाजपा नेते काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत आहेत आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. मंगळवारी याच भागात दुर्गच्या जुन्या बस स्थानकावर भाजपाची सर्वसाधारण सभा झाली. माजी मंत्री आणि कुरुडचे आमदार अजय चंद्राकर हे हेल्मेट घालून सभेत पोहोचले.
छत्तीसगढ़ : मंच पर हेलमेट लगाकर भाषण देने पहुंचे BJP MLA @Chandrakar_Ajay
— News24 (@news24tvchannel) December 21, 2022
◆ उन्होंने भूपेश बघेल सरकार पर लगाए आरोप pic.twitter.com/vbH2haH29m
आमदार अजय चंद्राकर यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर बोचरी टीका केली, तर दुसरीकडे त्यांच्या मंचावर झालेल्या दगडफेकीवरून पोलिसांचीही खरडपट्टी काढली. सोमवारी सायंकाळी सुपेला येथील गाडा चौकात अजय चंद्राकर यांच्या सभेत अचानक दगडफेक सुरू झाली. दगडफेक कोणी आणि का केली हे अद्याप समजू शकलेले नाही, मात्र मंचावरील नेत्यांच्या टेबलावर मोठे दगड पडले. या घटनेत भाजपा नेते थोडक्यात बचावले. या घटनेनंतर अजय चंद्राकर यांनी हेल्मेट घालून स्थानिक प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.
पत्रकारांशी बोलताना आमदार आणि माजी मंत्री अजय चंद्राकर म्हणाले की, दगडफेकीचा मी हेल्मेट घालून प्रतिकात्मक निषेध नोंदवला. ते म्हणाले की, दुर्ग जिल्ह्य़ात जनतेसाठी किमान पोलिसांची निर्मिती झाली आहे. सध्या सध्याच्या पोलिसांना व्हीआयपी ड्युटीपासून वेळ नाही. ते म्हणाले की, पोलीस कुणाच्या कुत्र्याला सांभाळत आहेत, तर कुणाच्या लहान मुलांची आणि अगदी महिलांचीही पहारा देत आहेत. हे काम फक्त पोलिसांचे राहिले आहे, त्यामुळे जनतेसाठी स्वतंत्र पोलीस दल स्थापन करावे. माझ्यासारख्या निवडून आलेल्या आमदार आणि माजी मंत्र्यावर जेव्हा दगडफेक होऊ शकते, तेव्हा इथल्या सामान्य जनतेची काय अवस्था होईल, गुन्हेगारांचे मनोधैर्य किती असेल याची तुम्ही कल्पना करू शकता, असे ते म्हणाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"