“असदुद्दीन ओवेसींना अजिबात घाबरत नाही, तेलंगणध्ये सत्तेत आल्यावर...”: अमित शहांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 10:44 AM2021-09-19T10:44:11+5:302021-09-19T10:45:26+5:30

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांना आम्ही अजिबात घाबरत नाही, असे म्हटले आहे.

bjp amit shah said not afraid of asaduddin owaisi and will celebrate hyderabad liberation day | “असदुद्दीन ओवेसींना अजिबात घाबरत नाही, तेलंगणध्ये सत्तेत आल्यावर...”: अमित शहांचे टीकास्त्र

“असदुद्दीन ओवेसींना अजिबात घाबरत नाही, तेलंगणध्ये सत्तेत आल्यावर...”: अमित शहांचे टीकास्त्र

googlenewsNext

निर्मल: केंद्रातील मोदी सरकार आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. आगामी विविध राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापताना दिसत आहे. अशातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांना तेलंगण राष्ट्र समितीवाले घाबरत असतील. पण आम्ही अजिबात घाबरत नाही, असे म्हटले आहे. (bjp amit shah said not afraid of asaduddin owaisi and will celebrate hyderabad liberation day after coming to power)

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Vi सह सर्व दूरसंचार कंपन्यांना दिलासा; ९ उपायांची घोषणा

तेलंगण येथील निर्मल येथे एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांची तेलंगण राष्ट्र समिती असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमला घाबरते. म्हणूनच तेलंगण दिवस साजरा करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला, असे अमित शहा यांनी म्हटले आहे. 

“केरळचा ‘अफगाणिस्तान’ होतोय, तालिबानीकरण गतीने वाढतेय”; भाजप नेत्याचा दावा

हैदराबाद मुक्ति दिवस साजरा करणार

एमआयएम आणि असदुद्दीन ओवेसी यांना भाजप घाबरत नाही. अन्य लोकांचे माहिती नाही. ओवेसी यांना पुढे करून त्यांच्या मागे लपणाऱ्यांनी एक लक्षात घ्यावे की, तेलंगणमधील जनता आता जागी झाली आहे. ओवेसींना पुढे करून आता ते वाचू शकणार नाही, असा इशारा देत तेलंगणमध्ये सत्तेत आल्यास १७ सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्ति दिवस साजरा करू, असा एल्गार अमित शहा यांनी यावेळी बोलताना केला. 

दिलासा! सलग १४ दिवस पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर; देशात सर्वाधिक भाव कुठे? पाहा, डिटेल्स

टीआरएसमध्ये दम राहिलेला नाही

तेलंगण राष्ट्र समिती पक्षात दम राहिलेला नाही. ते काँग्रेस आणि एमआयएमला टक्कर देऊ शकत नाही. त्यामुळे राज्यातील जनतेकडे भाजपचा सक्षम पर्याय बनू शकतो, असा दावा अमित शहा यांनी केला आहे. दरम्यान, भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतर निजामाने विलिनीकरणास नकार दिला होता. मात्र, तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेऊन सैन्याला पाचारण केले आणि अखेर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद भारताचा एक अविभाज्य भाग बनला.  
 

Web Title: bjp amit shah said not afraid of asaduddin owaisi and will celebrate hyderabad liberation day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.