'भाजप आणि ममता बॅनर्जींचे काँग्रेस मुक्त भारताचे स्वप्न', RSS च्या मासिकातून दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 02:30 PM2021-12-17T14:30:48+5:302021-12-17T14:31:42+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या 'स्वस्तिक' या बंगाली मासिकातील एक लेखात हा दावा करण्यात आला आहे.

'BJP and Mamata Banerjee's dream of a Congress-free India', claims bengali RSS magazine | 'भाजप आणि ममता बॅनर्जींचे काँग्रेस मुक्त भारताचे स्वप्न', RSS च्या मासिकातून दावा

'भाजप आणि ममता बॅनर्जींचे काँग्रेस मुक्त भारताचे स्वप्न', RSS च्या मासिकातून दावा

googlenewsNext

नवी दिल्ली:राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) शी संबंधित एका बंगाली मासिकात भारतीय जनता पक्ष (BJP) आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दोघांचे "काँग्रेस-मुक्त भारत" चे स्वप्न असल्याचा दावा करण्यात आला आहे. "स्वस्तिक" नावाच्या बंगाली मासिकात हा दावा करण्यात आला आहे, पण भाजपने या दाव्याचे खंडन केले आहे. हा लेख निराधार असून, त्याचा पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी काहीही संबंध नाही असे म्हटले आहे. तसेच, तृणमूल काँग्रेसनेही(TMC) या दाव्याला नाकारले आहे. 

"ममता इतिहास पुसून टाकण्यास का इच्छुक आहेत? गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी की सोनियांना नष्ट करण्यासाठी?" असे शीर्षक असलेल्या या लेखाला निर्माल्य मुखोपाध्याय यांनी लिहीले आहे. स्वस्तिक मासिकाच्या 13 डिसेंबरच्या अंकात हा लेख प्रकाशित झाला होता. या लेखात टीएमसी अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत नवी दिल्लीत झालेल्या भेटीचा संदर्भ दिला आणि दोघांचे "काँग्रेस-मुक्त भारत" चे स्वप्न असल्याचा दावा केला आहे.

दीदी शत्रू आणि प्रतिस्पर्ध्यांना जवळ आणत आहे

लेखात लिहीले की, "बदललेल्या भूमिकेवरून हे स्पष्ट होते की, ममता बॅनर्जी आधिसारख्या राहिल्या नाहीत. नरेंद्र मोदींचे काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न आहे. मला वाटते आता ममतांचेही तेच स्वप्न आहे. म्हणूनच त्या इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि यासाठीच त्या शत्रू आणि प्रतिस्पर्ध्यांना जवळ आणत आहे.

लेखाचा भाजपशी संबंध नाही

आरएसएसचे राज्य सरचिटणीस जिष्णू बसू म्हणाले की, त्यांनी हा लेख अजून वाचलेला नाही. संघाच्या संपादकीय आणि व्यवस्थापन समित्यांमध्ये संघाची पार्श्वभूमी असलेले अनेक लोक असल्यामुळे मासिक संस्थेशी संबंधित असल्याचे आरएसएसच्या सूत्रांनी सांगितले. भाजपच्या पश्चिम बंगाल युनिटचे प्रवक्ते शमिक भट्टाचार्य यांनी लेखाला "निराधार" म्हटले आणि पक्षाच्या धोरणाशी किंवा भूमिकेशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. 'स्वस्तिक' हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित मासिक असू शकते, परंतु त्यात अनेक लेख येतात जे आपल्या धोरणांना आणि तत्त्वांना अनुसरुन नाहीत, असे ते म्हणाले.

आता गुपित उघडे पडले-काँग्रेस

तृणमूल काँग्रेसचे राज्य सरचिटणीस कुणाल घोष यांनी भाजपसोबत तडजोड केल्याचा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. 'भाजपसोबत तडजोडीचे आरोप निराधार आहेत. ममता बॅनर्जी भगव्या छावणीच्या विरोधात मजबूत विरोधी चेहरा आहेत,'असे ते म्हणाले. तर, काँग्रेसने आता गुपित उघडे पडले, अशी टिप्पणी केली आहे. काँग्रेस नेते प्रदीप भट्टाचार्य म्हणाले, "आता हे रहस्य उघड झाले आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये गुप्त करार आहे आणि ते काँग्रेसला बरबाद करण्यासाठी एकत्र काम करत आहेत, असे आम्ही बरेच दिवस म्हणत होतो. पण त्यांचे स्वप्न यशस्वी होणार नाहीत."

Web Title: 'BJP and Mamata Banerjee's dream of a Congress-free India', claims bengali RSS magazine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.