भाजपा व राष्ट्रवादी पैसा घेऊन उभे आहेत
By admin | Published: January 26, 2017 02:08 AM2017-01-26T02:08:20+5:302017-01-26T02:08:20+5:30
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पैसे घेऊन उभे आहेत. आपल्याकडे इच्छुक असलेले राखीव उमेदवार डिपॉझिटची रक्कम पक्षाने भरावी यासाठी आग्रह धरत आहे. भाजपाकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. मात्र निष्ठावंत कार्यकर्ता बाजूला आहे तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार इच्छुकांच्या स्पर्धेत आहे. ज्या ठिकाणी उमेदवारीसाठी मागणी जास्त असते तेथे नाराजी देखील जास्त असते. थोडी ताकद लावली तर आपण देखील २५ जागांपर्यंत पोहचू शकतो.
Next
ज ल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पैसे घेऊन उभे आहेत. आपल्याकडे इच्छुक असलेले राखीव उमेदवार डिपॉझिटची रक्कम पक्षाने भरावी यासाठी आग्रह धरत आहे. भाजपाकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. मात्र निष्ठावंत कार्यकर्ता बाजूला आहे तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार इच्छुकांच्या स्पर्धेत आहे. ज्या ठिकाणी उमेदवारीसाठी मागणी जास्त असते तेथे नाराजी देखील जास्त असते. थोडी ताकद लावली तर आपण देखील २५ जागांपर्यंत पोहचू शकतो.शेतकर्यांच्या प्रश्नांना केंद्रीत कराजिल्हा परिषद निवडणुक ही ग्रामीण भागातील शेतकरी व कष्टकर्यांच्या प्रश्नांची निवडणुक आहे. नोटाबंदीच्या काळात रांगेत कोण उभे होते याची आठवण प्रचारा दरम्यान शेतकर्यांना करून द्या. शेतकर्यांच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रीत करून सत्ता हस्तगत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.विरोधकांची सत्तेसाठी कोटीची उडाणेपैशांच्या बळावर विरोधक सत्ता हस्तगत करण्याचे स्वप्न पाहत आहेत. जि.प.अध्यक्षपदाच्या उमेदवाराला निवडणुकीसाठी ५ कोटीच्या खर्चाचे तर सभापतीपदासाठीच्या उमेदवाराला १ कोटीचे टार्गेट दिले आहे. विरोधकांनी नितिमत्ता सोडली असली तरी मतदार राजा मात्र योग्य निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.काँग्रेसने त्रास दिला नाही तितका मित्रपक्षाने दिलाविधानसभा, नगरपालिकेत आपले विरोधक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला जितका त्रास दिला नाही त्यापेक्षा जास्त त्रास कुणी दिला आहे ते तुम्हाला माहित आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत देखील हा त्रास देण्याचा प्रयत्न होईल. मात्र शिवसेनेने अनेक आघात पचविले आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली त्यावेळी पक्षाचे काय होईल अशी भिती अनेकांना होती. मात्र शिवसेनेने संघर्ष केला आणि पक्ष वाढला असे त्यांनी सांगितले.